मुंबई: तिसऱ्या टप्प्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालं. तर काँग्रसेनंही आपला गड राखण्याची किमया केली आहे.


19 नगरपालिकांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी आठ नगरपालिकांमध्ये यश मिळालंय. तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर झेंडा फडकवता आला.

शिवसेनेला मात्र मराठवाड्यात खातंही उघडता आलं नाही. असं असलं तरी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढली आहे.

नांदेडच्या मुदखेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना, तर भंडाराच्या तुमसरचा निकालही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल यांना धक्का देणारा लागला.

नांदेडच्या मुखेडमध्ये अशोक चव्हाण यांचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झालीय. कारण काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुदखेड नगरपालिकेवर अपक्ष उमेदवार मुजीब अन्सारी विजयी झाले आहेत.

काँग्रेसनं नांदेडमध्ये इतर ठिकाणी मात्र चांगली कामगिरी केलीय. तर तिकडे भंडारा जिल्ह्यातले निकाल प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी धक्कादायक आहेत.

नगरपालिका निकाल LIVE


औरंगाबाद –
1)    कन्नड -  एकूण जागा- 23

  • काँग्रेस 14

  • रायभान जाधव आघाडी 4

  • शिवसेना 02

  • अपक्ष 01

  • MIM - 02

  • नगराध्यक्षपदी स्वाती कोल्हे- काँग्रेस (रायभान जाधव आघाडीच्या सरला वाडीकरांचा पराभव)


2)    पैठण –  एकूण जागा- 23

  • शिवसेना 7

  • भाजप 5

  • राष्ट्रवादी 6

  • काँग्रेस 4

  • अपक्ष - 1

  • नगराध्यक्ष - सूरज लोळगे - भाजप, (शिवसेनेच्या राजू परदेशींचा पराभव )


3)    गंगापूर – एकूण जागा-  17

  • शिवसेना - 8

  • काँग्रेस - 7

  • भाजप - 2

  • नगराध्यक्ष - भाजपच्या वंदना पाटील (भाजप-शिवसेना युती); (काँग्रेसच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव)


युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वंदना प्रदीप पाटील विजयी

4)    खुलताबाद – एकूण जागा- 17

  • काँग्रेस 8

  • भाजपा 4

  • शिवसेना 3

  • राष्ट्रवादी 2

  • नगराध्यक्षपदी- काँग्रेसचे एस.एम.कमर विजयी  (भाजपच्या नवनाथ बारगळ यांचा पराभव)


**************************************

नांदेड –
1)    धर्माबाद – एकूण जागा 19

  • राष्ट्रवादी 10

  • भाजप 4

  • काँग्रेस 2

  • सपा 1

  • बसपा 1

  • अपक्ष 1

  • नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अफजल बेगम


2)    उमरी - एकूण जागा 17

  • सर्वच्या सर्व जागी राष्ट्रवादीचा विजय

  • नगराध्यक्ष - अनुराधा खांडरे - राष्ट्रवादी


3)    हदगाव - एकूण जागा 17

  • काँग्रेस 8

  • शिवसेना 6

  • भाजप 2

  • राष्ट्रवादी 1

  • ज्योती राठोड - नगराध्यक्ष काँग्रेस


4)    मुखेड - एकूण जागा 17

  • भाजप - 09

  • शिवसेना - 03

  • काँग्रेस -02

  • रासप - 02

  • अपक्ष - 01

  • नगराध्यक्षपदी काँग्रेसचे बाबुराव देबाडवार


5)    बिलोली - एकूण जागा 17 -

  • काँग्रेस 12

  • भाजपा 4

  • अपक्ष 1

  • नगराध्यक्ष - मैथिली कुलकर्णी (काँग्रेस)


6)    कंधार - एकूण जागा 17

  • शिवसेना 10

  • काँग्रेस 5

  • अपक्ष 2

  • सत्ता शिवसेनेची, नगराध्यक्ष काँग्रेसचा


7)    कुंडलवाडी - एकूण जागा 17

  • भाजप - 10

  • काँग्रेस - 04

  • शिवसेना - 03

  • नगराध्यक्ष - भाजप


8)    मुदखेड - एकूण जागा 17

  • काँग्रेस 15

  • बसपा 1

  • अपक्ष 1

  • नगराध्यक्षपदी मुजीब अन्सारी (अपक्ष )


9)    देगलूर – एकूण जागा 25

  • काँग्रेस 12

  • राष्ट्रवादी 11

  • भाजपा 2

  • नगराध्यक्षपदी मोगलाजी शिरशेतवार - काँग्रेस


नगरपंचायत

अर्धापूर नगरपंचायत अंतिम निकाल

एकूण जागा- 17

  • काँग्रेस 10

  • राष्ट्रवादी 4

  • एम आय एम 2

  • अपक्ष 1

  • काँग्रेसला बहुमत


माहूर नगरपंचायत अंतिम निकाल - एकूण 17

  • राष्ट्रवादी 8

  • काँग्रेस 3

  • बीजेपी 1

  • एम आय एम 1

  • शिवसेना 4
    *****************


भंडारा –
1.    तुमसरनगर परिषद- एकूण जागा 23

  • भाजप-15

  • काँग्रेस- 3

  • राष्ट्रवादी-2

  • अपक्ष- 3

  • नगराध्यक्षपदी भाजपचे प्रदिप पडोळे विजयी.


राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा धक्का,विद्यमान नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांचा पराभव.,
नगराध्यक्षपदी भाजपचे प्रदिप पडोळे विजयी.

*****************
2.    पवनी नगर परिषद- एकूण जागा 17

  • नगर विकास आघाडी- 06

  • राष्ट्रवादी- 03

  • काँग्रेस- 06

  • भाजप -2

  • नगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या पुनम काटेखाटे विजयी


3.    भंडारा नगर परिषद- एकूण जागा 33

  • भाजप- 15

  • राष्ट्रवादी- 11

  • काँग्रेस- 3

  • अपक्ष-4

  • नगराध्यक्षपदी भाजपचे सुनिल मेंढे विजयी.


4.    साकोली नगर परिषद- एकूण जागा 17

  • भाजप 12

  • काँग्रेस 1

  • राष्ट्रवादी 1

  • अपक्ष 3

  • धनवंता राऊत, भाजपच्या नगराध्यक्ष विजयी


**************************************************************

गडचिरोली
1)    गडचिरोली – एकूण जागा- 24

  • भाजप- 20

  • अपक्ष 03

  • काँग्रेस 01

  • राष्ट्रीय समाज पक्ष - 01

  • नगराध्यक्ष भाजप योगिता पिपरे विजयी


2)    देसाईगंज – एकूण जागा- 17

  • भाजपा 12

  • काँग्रेस 4

  • राष्ट्रवादी काँग्रेस 1

  • नगराध्यक्षपदी भाजपाच्या शालू दंडवते विजयी


***********************************************