'आजवर माझ्यावर अनेकदा टीका झाली. पण मी काही बोलले नाही, पण आता माझ्या लोकांनी मौन बाळगू नका उत्तर द्या, अशी शपथ घातलीय म्हणून मी बोलतेय. आमचे बंधू म्हणतात की, त्यांना मुंडेसाहेबांनी पक्षातून बाहेर काढलं. तर दोनच दिवसांनी अजित पवार म्हणतात की, राष्ट्रवादीत येण्यासाठी धनंजय मुंडे जवळपास दीड वर्षात फेऱ्या मारत होते. त्यामुळे आता नेमकं खोटं कोण बोलतंय? हे त्यांनीच जाहीर करावं.' असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा खरपूस समाचार घेतला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उदगीर व जळकोट तालुक्यात पंकजा मुंडे यांनी काल सभा घेतल्या.
धनंजय मुंडेंच्याच सांगण्यावरुन अजित पवार बोलले : पंकजा मुंडे
काय आहे नेमकं प्रकरण:
'भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. त्यांच्यासोबत पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मात्र मुंडे हे लोकसभेचे उपनेते होते, अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असं मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही.' असा धक्कादाय खुलासा अजित पवारांनी माझा कट्टावर केला होता.
'पक्ष सोडण्याची संपूर्ण तयारी झाली होती. त्यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी समजूत घातली आणि मुंडेंनी निर्णय बदलला, असा दावा अजित पवारांनी केला. मुंडेंसोबत इतर आमदार जाऊ नयेत, यासाठी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यासारखे भाजप नेते प्रयत्नशील होते, असंही त्यांनी सांगितलं होतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या काळात भाजप आतासारखी नव्हती, असं मतही अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.'
'आमदार धनंजय मुंडे यांचे पिता पंडित अण्णा मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी काही घटना घडतात, गोपीनाथ मुंडेंना सोडू नका, असा सल्ला मीच धनंजय मुंडेंना दिला होता. असंही अजित पवार म्हणाले. मात्र वर्षभरानंतर त्यांनी पुन्हा माझी भेट घेतली. आपल्याला त्या पक्षात (भाजप) राहायचंच नाही, राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नसेल, तर आपल्यासाठी इतर पक्षांची दारं उघडी आहेत, असं धनंजय मुंडेंनी सांगितल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.' असंही अजित पवार म्हणाले होते.
मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट
पवारांना पाहून मुंडेंनी वाढदिवस ठरवला : अजित पवार
गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
'पवारांच्या घरी संस्काराची कमी'
“मी नेहमी शरद पवार यांचा आदर, सन्मान केला आहे. हा माझ्या संस्काराचा भाग आहे. पण अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन पवारांच्या घरात संस्काराची कमी असल्याचं दिसतं.”
तसंच गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल माझ्याशी कधीच चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीलाही गेले नाही, असा दावाही पंकजा यांनी केला आहे.
“गोपीनाथ मुंडेंनी जन्म तारीख बदलल्याचा आरोप धादांत खोटा”
मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती: धनंजय मुंडे
‘मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती. भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे माझं नेतृत्व लादलेलं नाही. पंकजा, प्रीतम मुंडे यांचं नेतृत्व लादलेलं आहे की नाही याबाबत मात्र, मी काहीही बोलणार नाही. विधानसभा निवडणुकीत माझा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला. याला मी काही पराभव मानत नाही.’ असं धनंजय मुंडे यांनी माझा कट्टावर सांगितलं होतं.
संबंधित बातम्या:
दुर्दैवानं, पंकजा मुंडेंसोबत काही नातं राहिलं नाही: धनंजय मुंडे
पवारांच्या घरात संस्काराची कमी : पंकजा मुंडे