Maharashtra Election Commission protest: राज्यातील मतदारयाद्यांतील घोटाळा, तसेच दुबार आणि बोगस मतदारांविरोधात महाविकास आघाडी, मनसे आणि इतर सर्वपक्षीय संघटना उद्या (1 नोव्हेंबर) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेचा सक्रीय सहभाग निश्चित झाला असला तरी काँग्रेसची भूमिका मात्र अजूनही धूसर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal Congress) यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेणं टाळल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संभ्रम अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा मनसेला विरोध असल्याने मोर्चाच्या भूमिकेत अजूनही स्पष्टता आलेली नाही.
“मोर्चात सहभागी होणार की नाही यापेक्षा मुद्दा महत्त्वाचा” (Congress stance on voter fraud)
दरम्यान, एबीपी माझाच्या मोर्चात सहभागी होणार का? या थेट प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “सहभागी होणार की नाही यापेक्षा मोर्चाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.” त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, “हा सर्वपक्षीय मोर्चा आहे. सर्वांनी मोर्चात यावं, असं निमंत्रण आहे. काँग्रेस पक्ष या मोर्चाला पाठिंबा देतो आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा सहभाग म्हणजे पक्षाचाच सहभाग आहे.” मात्र, या विधानातूनही ते उपस्थित राहणार की नाही याबाबत स्पष्ट उत्तर देणं टाळलं.
“मतं चोरीचा मुद्दा गंभीर” (voter list fraud Maharashtra)
सपकाळ यांनी राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटलं की, “राहुल गांधी यांनी मतं चोरीचा मुद्दा देशभर उचलला आहे. त्यामुळे हा मोर्चा त्या लढ्याचाच भाग आहे. काँग्रेस या मोर्चाच्या पाठिशी आहे.” मात्र, काँग्रेसची उपस्थिती प्रत्यक्षात कितपत असेल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्याची रणनीती (MVA and MNS rally Mumbai)
या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि मनसेचा सहभाग आहे. महाविकास आघाडी आणि मनसे यांची एकमुखी मागणी आहे की, “जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत.” उद्याच्या मोर्चानंतर सर्व विरोधी पक्षांकडून एकत्रित घोषणा केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील बोगस मतदार वगळेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अन्यथा कोर्टात जाण्याचा पर्याय स्वीकारला जाईल.
ठाकरे गट याचिका दाखल करणार
दुसरीकडे, विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर आता न्यायालयीन लढाई उभी करण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “मतदार याद्यांतील गोंधळ आणि बोगस मतदारांचा मुद्दा न्यायालयात नेऊन याचिका दाखल केली जाणार आहे.” तसेच, जोपर्यंत राज्य निवडणूक आयोग हे घोळ दूर करत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी कोर्टात जाणार आहे. मागील सर्वपक्षीय बैठकीत तीन ते चार पर्यायांवर चर्चा झाली, त्यामध्ये न्यायालयात जाणं, निवडणुकांवर बहिष्कार टाकणं आणि निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणं हे पर्याय चर्चेत आले.
इतर महत्वाच्या बातम्या