औरंगाबाद : आधी मराठा समाजाचा मोर्चा, मग ओबीसी मोर्चाची तयारी आणि आता मुस्लीम समाजाची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. आरक्षणासाठी मुस्लीम समाजानेही रस्त्यावर यावं, असं आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी केलं आहे.


10 टक्के आरक्षणासाठी मुस्लीम समाजानेही आता मोर्चे काढावेत, असं अबू आझमी म्हणाले. औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाजाची एकजूट दिसते, तशी एकजूट आरक्षण मिळवण्यासाठी मुस्लीम समाजाचीही दिसली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मुस्लीम समाजाच्या या मोर्चाच्या आयोजनाची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत आज सर्वपक्षीय मुस्लिमांची बैठक होणार आहे. इस्लाम जिमखान्यात संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल.

दरम्यान घोषणा करुनही उत्तर प्रदेशात मुस्लीम आरक्षण का लागू झाले नाही, यावर मात्र आझमी यांनी मौन बाळगलं.

पाहा व्हिडीओ