सांगली : सांगलीत एकाच कुटुंबातील चार महिलांच्या हत्याकांडाने थरकाप उडाला आहे. मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करुन हे हत्यांकाड केलं.
जत तालुक्यातील कोड्डणूर गावात ही धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या हत्यांकाडात सुशीला कुंडलिक इरकर (वय-60) सासू, सिंधुबाई भारत इरकर (वय-40), सून, रुपाली भारत इरकर, (वय-19) मुलगी, राणी भारत इरकर, (वय-16) मुलगी, यांचा मृत्यू झाला आहे.