जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे. मात्र मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्यानं निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोगानं त्यासाठी तयारीही पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधी सूचना देण्यात आल्या असून पुढच्या काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजत असले, तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.
कोणत्या दहा महापालिकांचा समावेश
1. मुंबई
2. पुणे
3. पिंपरी चिंचवड
4. ठाणे
5. उल्हासनगर
6. नाशिक
7. नागपूर
8. अकोला
9. अमरावती
10. सोलापूर
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच
अर्थसंकल्पापूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका असून सरकार अर्थसंकल्पात घोषणा करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, असा आक्षेप शिवसेनेसह विरोधकांनी घेतला होता. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी करत निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या मागणीला उत्तर द्या, अशी सुचना सरकारला केली होती. मात्र आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर होईल, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्येच इतर राज्यांच्या निवडणुका
गोवा विधानसभा निवडणूक :
4 फेब्रुवारीला मतदान
11 मार्चला निकाल
मणिपूर विधानसभा निवडणूक :
4 मार्च, 8 मार्चला मतदान
11 मार्चला निकाल
उत्तराखंड विधानसभा निवडणूक :
15 फेब्रुवारीला मतदान
11 मार्चला निकाल
पंजाब विधानसभा निवडणूक :
4 फेब्रुवारीला मतदान
11 मार्चला निकाल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक :
11 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 4 मार्च, 8 मार्चला मतदान
11 मार्चला निकाल