मुंबई : भक्तांच्या घरचा दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा गुरूवारी आपल्या गावी जाण्यास निघणार आहेत. वाजतगाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर तसेच मुंबई  महापालिका, पोलिस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विसर्जनाच्या दिवशी (28 सप्टेंबर) मुंबई शहर आणि उपनगरातील महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहे.  तसेच विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त  (Anant Chaturdashi) मुंबई पोलिसांच्या रजा  रद्द करण्यात आल्या आहे.  वैद्यकीय रजा वगळता इतर सगळ्या रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. 


शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील  काही रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सकाळी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  अनेक मार्गांवर वाहनं पार्क करण्यास बंदी करण्यात आलीय आहे.  बंद असलेल्या मार्गांचे पर्यायी मार्ग सुद्धा वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहे. त्यासह अनेक मार्गांवर वाहनं पार्क करण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच या दिवशी मुंबई येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. भाजीपास, दूध तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. 


हे मार्ग वाहतुकीसाठी बंद


नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शनते मेट्रो जंक्शन, जे. एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता,  पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग,  पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग,  एन. एम. जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलान आझाद रोड, बेलासिस रोड,मौलाना शौकत अली रोड, डॉ. बी. ए. रोड, चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड,  स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल, 60 फिट रोड, माहिम सायन लिंक रोड, टी. एच. कटारिय मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड,  एल. बी. एस. रस्ता, न्यु मिल रोड, संत रोहिदास मार्ग 


हे ही वाचा :


Mumbai Local : मुंबईकरांना बाप्पा पावला! गणेश विसर्जनाला मध्य रेल्वेवर मध्यरात्री 10 विशेष लोकल