कोल्हापूरची विमानसेवा गेल्या 6 वर्षांपासून रखडली होती. अनेक वेळा या विमानसेवेच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या. मात्र कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा कोल्हापूर - मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.
मुंबईतून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.
खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत नियोजन केलं आहे. कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.