Mumbai : मुंबईच्या दहिसर पश्चिम परिसरात ठाकरे गटाच्या चार कार्यकर्त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दहिसर पश्चिमेत एम.एच.बी पोलीस स्टेशनमध्ये अनधकृत फेरीवाल्यांकडून पैसे मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. दहिसर पश्चिम आय सी कॉलनी परिसरात असलेल्या फेरीवाल्यांना ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांनी कार्यालयात बोलून धमकी देऊन 5000 रुपयांची मागणी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

Continues below advertisement

फेरीवाल्यांना ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांनी पैशांची मागणी केली

दहिसर पश्चिम आय सी कॉलनी परिसरात असलेल्या फेरीवाल्यांना ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांनी पैशांची मागणी केली आहेय याच प्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी ठाकरे गटाचे दहिसर युवा सेना विभाग अधिकारी जितेन परमार, युवा सेना उपविधान चिटणीस दर्शीत कोरगावकर सोबत कार्मो आणि शेनाल विरोधात गुन्हा दाखल केली आहे. आणखी या व्यक्तीने आणखी किती लोकांना धमकी देऊन खंडणी घेतली आहे. त्यासोबत या टोळीमध्ये आणखी कोण कोण सदस्य आहेत का या संदर्भात एम.एच.बी पोलीस अधिक तपास करत आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात बोलावून फेरीवाल्यांना पैसे मागितल्याचे सांगण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांकडे 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्युनिअर कॉलेज बाहेर बिना परवाना आंदोलन करणारी महिलांविरोधात गुन्हा दाखल

गोरेगाव पश्चिम परिसरात विवेक ज्युनिअर कॉलेज बाहेर बिना परवाना आंदोलन करणारी महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुस्लिम महिलांकडून विवेक कॉलेज बाहेर मागील तीन दिवसापासून कॉलेजमध्ये हिजाब परवाना मिळावा यासाठी आंदोलन सुरू होता. मात्र हिजाब विरोधात आज विवेक कॉलेज बाहेर हिंदुत्ववादी संघटना कडून आंदोलन करण्यात आला आहे. यावेळी हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटना अमोर समोर आली, विवेक कॉलेज बाहेर मोठा तणावाचा आणि गोंधळाचा वातावरण निर्माण झाला आहे. यानंतर आंदोलक मुस्लिम महिलांना गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले, बिना परवाना आंदोलन केल्यामुळे तीन मुस्लिम महिला विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला आहे. तर या आंदोलकांमध्ये आणखी कोण महिला होती का त्यासोबत या आंदोलकाचं मागचं काही वेगळा हेतू होता का या संदर्भात गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Ambernath: अंबरनाथ स्टेशन परिसर फेरीवाले मुक्त करा, अन्यथा...; अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक