मुंबई : साईभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने खुशखबर दिली आहे. मुंबईहून शिर्डीसाठी आठवड्यातून तीन दिवस धावणारी शिर्डी साईनगर एक्स्प्रेस आता दररोज धावणार आहे.


साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या मुंबईकर भाविकांना रेल्वे मंत्रालयाने मोठी खुशखबर दिली आहे. शिर्डीसाठी आठवड्यातून सोमवारी, बुधवारी, आणि शनिवारी सुटणारी ‘दादर-साईनगर शिर्डी’ही एक्स्प्रेस यापुढे दररोज धावेल, अशी घोषणा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

तसंच शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साईदर्शन घेतलं आणि साईनगर रेल्वे स्टेशनची पाहणीही केली.