Maharashtra Mumbai Rains LIVE : मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, कुंभार्ली घाटात दरड कोसळली

Maharashtra Mumbai Rains Update Today : मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2022 04:17 PM
Mumbai Rain : कुर्ला नेहरुनगर विभागात तीन-चार फूट पाणी भरलं

मुंबईच्या कुर्ला नेहरूनगर विभागात तीन ते चार फूट पाणी भरले आहे. नेहरूनगर मधील वालावलकर स्कूलच्या बाहेर रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. वालावलकर शाळेतही तीन ते चार फूट पाणी भरले आहे

कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRF च्या दोन तुकड्या रवाना

Kolhapur Rain update : पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या पुण्याहून रवाना झाल्या आहेत. 

 कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

 कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.  कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाराघाट आहे. कोकणातील येणाऱ्याची वाट बिकट झाली आहे. कोकणाला जोडणारे दोन प्रमुख मार्गावरील घाट वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. एक परशुराम घाट आणि दुसरा कुंभार्ली घाट.




 

बदलापूर बेलवली जवळील रेल्वेचा सब वे, भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद
मुसळधार पावसामुळे बदलापूर बेलवली जवळील रेल्वेचा सब वे, भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या सब वे मध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचल्याने दुर्घटना होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने सब वे बंद केला आहे. सब वे बंद झाल्यानं पूर्वेकडून पश्चिमेला ये जा करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय वाहनचालकांना अडीच ते तीन किलो मीटर चा वळसा मारुन प्रवास करावा लागतो आहे. अवघ्या एक महिन्या पूर्वी पावसाचे आणि इतर सांडपाण्याचा निचरा व्हावा म्हणून लाखो रुपये खर्चून या सब वेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. परिणामी पुन्हा सब वे मध्ये पाणी साचल्याने सब वे बंद करण्याची वेळ आली आहे.
महाड-पोलादपूरमध्ये अतिवृष्टीमुळं पूरस्थिती, प्रविण दरेकरांची घटनास्थळी धाव

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने आज सकाळी महाड येथे धाव घेतली.अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. महाड तालुक्यातील दासगाव येथे भली मोठी संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्या संरक्षक भिंतीच्या खाली नागरी वस्ती आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांनी तातडीने येथे योग्य मदत कार्य करण्याच्यादृष्टीने तहसिलदार काशिद व अन्य अधिका-यांच्यासमेवत त्या भागाची पाहणी केली. तेथील लोकांना तातडीने अन्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश दिले आहेत. 



चेंबूरमध्ये घरात शिरलं पाणी, अनेक रहिवाशांनी सोडली घरं

मुंबई मध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं मुंबईच्या सखल वस्तीत मोठ्या प्रमाणत पाणी भरले आहे. चेंबूर येथील पोस्टल कॉलनी परिसरात तीन ते चार फूट पाणी भरले आहे. पाणी इथल्या घरांमध्ये शिरल्यानं रहिवासी घरे सोडून निघून गेले आहेत. इथल्या रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. दरवर्षी या ठिकाणी अशीच स्थिती होत असते. 

चेंबूरची पोस्टल कॉलनी जलमय, नागरिकांनी सोडली घरे

चेंबूरची पोस्टल कॉलनी जलमय झाली आहे. अनेक घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळं नागरिकांनी घरे सोडली आहेत.

उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

कर्जत आणि बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळीत मुसळधार पावसामुळं वाढ झाली आहे. कर्जत आणि ग्रामीण भागात अजूनही पावसाची संततधार सुरुच असल्यानं नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं आजूबाजूच्या गावांना आणि गृहसंकुलांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 2019 साली एकाच आठवड्यात दोन वेळा आणि 2021 साली एकदा या नदीला आलेल्या महापुराचा फटका शेकडो बदलापूरकरांना बसला होता. असे असताना प्रशासनानं अजूनही पूर नियंत्रण रेषेसंबंधी अजून ठोस निर्णय घेतलेला नाही. उल्हास नदीमुळे दरवर्षी बदलापूरकरांना महापुराचा सामना करावा लागतो.

पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 25 फुटांवर

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीचा पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहे.  धोकादायक मार्गावरुन वाहतूक करु नये असं जिल्हा प्रशासनानं आवाहन केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRF च्या दोन तुकड्या रवाना झाल्या आहे. 



Mumbai Rains Updates : असं कसं घडलं? मुंबईत धो धो पाऊस आणि हिंदमातात पाणी साचलंच नाही!

Mumbai Rains Hindmata Water Logging : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना हिंदमाता परिसरात यंदा पाण्याचा निचरा वेगाने झाला. यासाठी मुंबई महापालिकेची मागील वर्षीची तयारी महत्त्वाची ठरली.

Mumbai Rains Updates: मानखुर्द रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक मंदावली

मानखुर्द रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक मंदावली आहे. मानखुर्द रेल्वे उड्डाणपूल इथं झालेल्या अपघाताने दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीची गती मंदावली आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Mumbai Rains Updates: मुंबईत पावसाची दमदार हजेरी; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत

मुंबईत पावसाने (Mumbai Rains) दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोडी झाल्याचे चित्र आहे. तर लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Mumbai Rain Updates : मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rain Updates : मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज


7 जुलै आणि 8 जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज 


रायगड, रत्नागिरीत पुढील 4 दिवस अतिवृष्टीची शक्यता, चारही दिवस रेड अलर्ट

पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली

Mumbai Rains : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत

Maharashtra Rains Update ; कोल्हापूर जिल्ह्यात NDRF च्या दोन तुकड्या रवाना होणार

कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या थोड्याच वेळात रवाना होणार आहे. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. NDRF च्या एका तुकडीत 25 जवान असे 50 जवान कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचणार आहेत. NDRF ची एक तुकडी शहरी भागात तर दुसरी ग्रामीण भागात काम करणार आहे.  पुण्यातून दोन्ही टीम थोड्याच वेळात कोल्हापूरसाठी बाहेर पडतील.

पावसामुळं अंधेरी सब वे वर पाणी, वाहतूक बंद

मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पावसामुळं अंधेरी सब वे वर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतूक बंद करण्यात आली आहे.


 

मागील 12 तासांपासून मुंबई आणि उपनगरात धुंवाधार

गेल्या 12 तासापासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, वाशीत 155 मिमीहून अधिक पाऊस

गेल्या 12 तासापासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मागच्या 12 तासात सायन परिसरात 120 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. मुंबई विमानतळ परिसरात 94 मिमी पाऊस झाला आहे.  नवी मुंबईतील वाशीत 155 मिमीहून अधिक पाऊस सुरु आहे. दुपारनंतर पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 



कोकणात पावसाची संततधार सुरु

  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद

 Raigad Rain : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून आजपर्यंत एकूण सरासरी 696.64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.



  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद

 Raigad Rain : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून आजपर्यंत एकूण सरासरी 696.64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.



रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

Ratnagiri Rain : सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे. हा घाट धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली असून, घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या घाटाची पाहणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. 



लोकलसेवेवर पावसाचा परिणाम, पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटांनी उशीरा

पनवेलमधील पाताळगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ, सखल भागातील नागरिक सुरक्षीत स्थळी

पनवेलमधील पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या त्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान, सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अद्याप कोणतेही नुकसान नाही.



रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे.  त्यामुळं नद्या नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर कालपेक्षा कमी असला तरी 7 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मागील 24 तासात सरासरी 157 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे लांजा तालुक्यात 342 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. कालच्या पावसामुळं परशुराम घाट अजूनही बंद आहे त्यामुळं अवजड वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावर पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली आहे.

जगबुडी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर

खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर गेली आहे. डगबुडीची पाणी पातळी 5.75 मिटरवर गेली आहे. लांजामधील काळजी नदी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवरुन वाहत आहेत. 

धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

धुळे जिल्ह्यात जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जुलैमध्ये काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.  त्यामुळं 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्यात न करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 50 टक्क्याहून अधिक पेरण्या झाल्या आहेत.  तसेच शिरपूर तालुक्यात देखील पावसाने काही प्रमाणात आघाडी घेतली असली तरी अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पावसाची हजेरी

अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदुर पावसाची हजेरी लावली आहे. सध्याही पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. 

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

हवामान खात्यानं पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्यानं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तसेच NDRF च्या जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सिंधुदुर्गमध्ये निर्मला नदीला पूर, 27 गावांचा संपर्क तुटला

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहेय या पावसामुळं निर्मला नदीला पूर आला आहे. या पुरामुळं 27 गावांचा संपर्क तुटला आहे. 

मुंबईत गेल्या 12 तासात 95.81 मिमी पावसाची नोंद

मुंबईत गेल्या 12 तासात 95.81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात 115.09 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 116.73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 



यवतमाळ जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर दमदार पाऊस झाला. तसेच अनेक भागात पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.  रखडलेल्या पेरण्यांना आला वेग 
आला आहे. दोन दिवसात तीन लाख हेक्टर वर कपाशी, सोयाबीन, तूर पिकांची लागवड झाली आहे. पांढरकवडा, वणी, झरीजामनी, मारेगाव या तालुक्यात 40 मीलीपेक्षा जास्त पाऊस झाला. तर इतर तालुक्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. 



कोकणातील जगबुडी आणि वाशिष्ठी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

सध्या कोकणात मुसळदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं कोकणातील जगबुडी आणि वाशिष्ठी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं पुराचा धोका वाढला आहे. प्रशानसानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 



कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पाणी पातळी 7 फुटांनी वाढली

कोल्हापूरमध्ये देखील कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. एका रात्रीत पंचगंगेची पाणी पाचळी 7 फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर गेली आहे.



कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, 24 तासात धरणात 2 टीएमसी पाणी वाढले 

कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात कोयना धरणात 2 टीएमसी पाणी वाढले आहे. गेल्या 24  तासात महाबळेश्वरमध्ये 118 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.  तर कोयनेत 74 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद 14 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक  सुरु आहे. सध्या कोयनेत 16 टिएमसी पाणीसाठा आहे. 



पालघर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस

पालघर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्याही संततधार सुरुच आहे. किनारपट्टी भागातही पावसाचा जोर कायम आहे. 



वाशिम जिल्ह्यात सर्वदूर रात्रभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

Washim Rain : वाशिम जिल्ह्यात सर्वदूर रात्रभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. तर अनेक भागात सकाळीही पावसाची रिमझिम सुरुच आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.



पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rains LIVE :  सध्या मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. 




रायगड रत्नागिरीमध्ये NDRF च्या टीम तैनात


राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.