- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Mumbai Rains LIVE: पूर परिस्थिती भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कार्यकर्त्यांना आवाहन
Maharashtra live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील पाऊस, राजकारण, समाजकारण आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळवा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आज देखील पावसाचा जोर असणार आहे. मात्र, त्याची तीव्रता कमी होताना दिसेल. आज उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर...More
पुणे : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव हद्दीत रात्रीच्या सुमारास टोयोटा कार (MH 12 HZ 9299) रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात राहुल विश्वास पानसरे यांचा मृत्यू झाला, तर राहुल देवराम मुटकुले हे जखमी झाले आहेत. दोघे गणपतीपुळे जात होते. पावसामुळे आणि धुक्यामुळे रस्ता न दिसल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.
Latur Rain : गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाचा लातूर जिल्ह्यात खरीप पिकांना मोठा फटका बसलाय... याचबरोबर या पावसाचा टोमॅटो पिकालाही तडाखा बसलाय... ऐन काढणीच्या वेळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे... त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्किल बनले आहे... एक एकर टोमॅटो लागवडीसाठी साधारणतः ३० ते ४० हजार रुपये इतका खर्च येतो... पावसामुळे टोमॅटोच्या बागेचे नुकसान झाल्याने हा लागवडीचा खर्च तरी काढायचा कसा ? असा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर साध्या निर्माण झालाय...सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
लातूर : गेल्या दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय... खासकरून नदीकाठच्या शेतातील पिकांना मोठा तडाखा बसलाय... मांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा जिल्ह्यातील उजेड या गावाला मोठा तडाखा बसला असून, पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात घुसल्याने गेल्या दोन दिवसांपासून पिके पाण्याखाली आहेत... शेतामध्ये जवळपास पाच ते दहा फुटापर्यंत पाणी साचले असून, शेतातील इतर साहित्यही पाण्याखाली गेली आहेत... शिवारातील जवळपास पाचशे हेक्टरवरील पिके पाण्यात असून, हातचे पीक गेल्या जमा आहे...पाणी साचल्यामुळे शिवाराला तळ्याचे रूप आले आहे...नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले असून, सरकारने अशा संकटसमयी मदतीचा हात तत्काळ पुढे करण्याची मागणी शेतकरी करताहेत...
नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील उड्डाणपूलाखाली एका 35 वर्षीय मजुराचा चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.लघु शंका करू नको या शुल्लक कारणावरून बंडू गांगुर्डे यांच्या छातीत आणि पोटात संशयित आरोपी जयेश रायबहादूर याने चाकूने हल्ला केला या हल्ल्यात बंडू हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र काल उपचारादरम्यान बंडू गांगुर्डे याचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित जयेश रायबहादुर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी जयेश याच्याविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचे देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला करून जयेश रायबहादूर हा फरार झाला असून मुंबई नाका पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नाशिक शहरात खुनाच्या घटनांची मालिका सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
गोदावरी नदीच्या पुरस्थितिची मंत्री गिरीश महाजन करणार पहाणी
जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री थोड्याच वेळात रामकुंड परिसरात जाऊन करणार पुराची पहाणी
शनिवारी रात्रीपासून नाशिक शहर।आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीला आलाय पूर
रविवारी भांडी बाजार, सराफ बाजारात शिरले होते पाणी
गोदा काठावरील रस्ते झाले होते जलमय
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचे राज्यपालांना पत्र
राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसानं झाले आहे
या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा
शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी
आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील ही परिस्थिती पाहता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय व्हावा ही मागणी वडेट्टीवार यांनी केली
याबाबत विशेष अधिवेशनात चर्चा व्हावी म्हणून राज्यपालांना वडेट्टीवार यांनी लिहिले पत्र
5 ऑक्टोबर पर्यंत राज्यात सर्व पंचनाम्याचे काम पूर्ण केल्याचे लक्ष ठेवले आहे
दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत केली जाईल.
शेतकऱ्यांना सरकारी मदत द्यायला सरकारला कुठलीही अडचण येणार नाही
टीव्हीके प्रमुख अभिनेता विजयला राहुल गांधींचा फोन
तामिळनाडूतील करुर मध्ये विजयाच्या रॅलीत झाली होती चेंगराचेंगरी
काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या डीएमकेचा विरोधक मानला जातो विजय
चेंगारचेंगरी प्रकरणी तपास करण्याची विजयने मागणी केली आहे
पूर परिस्थिती भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कार्यकर्त्यांना आवाहन
पूर परिस्थिती भागात मंत्र्यांनंतरआता आमदार खासदार आणि पदाधिकार्यांना दौरे करण्याच्या सूचना
दसरा मेळाव्यानंतर पूर परिस्थिती भागात आमदार, खासदार आणि पदाधिकार्यांकडून अत्यावश्यक मदतीचे वाटप करण्याच्या सूचना
संकट तिथे शिवसेना हे आपलं धोरणं आहे, त्यामुळे संकट दिसताच मदतीसाठी तत्पर रहा, निमंत्रणची वाट पाहत बसू नका अशा सूचना शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यात दिल्या आहेत
सांगली, कोल्हापूर, कोकण राज्यातच नाही तर पर राज्यातही केरळ, उत्तराखंड येथेही आपण मदत केल्याचे दाखले शिंदेंनी पदाधिकार्यांना दिले
मंत्री शेतकर्याच्या बांधावर जाऊन आले, आता आपली मदत त्यांच्या घरापर्यंत पोचतीकरा अशा सूचना शिंदेंनी पदाधिकार्यांना दिल्या असल्याची सूत्रांची माहिती
पूर परिस्थिती भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कार्यकर्त्यांना आवाहन
पूर परिस्थिती भागात मंत्र्यांनंतरआता आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दौरे करण्याच्या सूचना
दसरा मेळाव्यानंतर पूर परिस्थिती भागात आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांकडून अत्यावश्यक मदतीचे वाटप करण्याच्या सूचना
संकट तिथे शिवसेना हे आपलं धोरणं आहे, त्यामुळे संकट दिसताच मदतीसाठी तत्पर रहा, निमंत्रणची वाट पाहत बसू नका अशा सूचना शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यात दिल्या आहेत
सांगली, कोल्हापूर, कोकण राज्यातच नाही तर पर राज्यातही केरळ, उत्तराखंड येथेही आपण मदत केल्याचे दाखले शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले
मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले, आता आपली मदत त्यांच्या घरापर्यंत पोचतीकरा अशा सूचना शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची सूत्रांची माहिती
गोदावरी काठावर पुराचा धोका वाढलाय, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील 30 गावांना हा धोका वाढला असून रात्रभर प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर केलंय,..जिल्ह्यात जवळपास 8 हजार नागरिकांना शाळा, महाविद्यालय आणि इतर धार्मिक ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे.अनेक महिला पुरुष रात्रभर जाग राहून जीव वाचवत स्थलांतरित झाली, जीव वाचला पण संसार उपयोगी साहित्य गोदा पात्रात वाहून गेल,
तात्पुरतं स्थलांतरित केलेल्या याच महिलांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी रविंद्र मुंडे यांनी..
तळकोकणात संततधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार असून जिल्ह्याला तीन दिवस 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामानातील या प्रतिकूल बदलांमुळे समुद्र कमालीचा खवळला असून बंदर विभागानेही मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गवरील दुसऱ्या बाजूची वाहतूक देखील आता बंद
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर्णतः बंद
पुणे, सोलापूरहुन विजयपूरच्या दिशेने जाणारी आणि परतणारी वाहतूक हत्तूर गावाजवळ पूर्ण बंद
काही वेळापूर्वी केवळ एका बाजूने वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती, मात्र पाणी वाढल्याने आता दोन्ही बाजूने वाहतूक पूर्ण बंद करण्यात आलीय
जायकवाडी धरणातून पाण्याचा विक्रमी विसर्ग झाला आणि गोदाकाठची गाव अक्षरशः पाण्यात बुडाली, प्रशासनाच्या तत्परतेने जीव वाचला मात्र संसार पाण्यात वाहून गेला, अनेक जन धास्तीने रात्रभर जागी होती.
जायकवाडी धरणातून प्रथमच विक्रमी असा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे, त्यामुळे नांदेडमध्ये सध्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील अनेक सखल भाग हे पाण्याखाली आहेत. त्यामुळे मनपाने पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र उभारले आहेत. जायकवाडीचा विसर्ग जोवर कमी होत नाही तोवर नांदेडची पूरस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिलेला आहे
शिऊर : रात्री अचानक प्रकृती बिघडलेल्यायुवतीला ओढ्याला आलेल्या पुरामुळे रुग्णालयात लवकर पोहोचविता आले नाही. परिणामी सदर युवतीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घडली. वैष्णवी योगेश जाधव (वय १७) असे मृत युवतीचे नाव आहे. विशेष म्हणजे १० दिवसांत घरात आजोबांनंतर नातीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिऊर येथील योगेश वसंतराव जाधव यांची मुलगी वैष्णवी हिची शनिवारी मध्यरात्री एक वाजता तब्येत बिघडली. यावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. नातेवाइकांनी तिला शिऊर बंगला येथील खासगी रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र खड्यांचा रस्ता व ओढ्याला आलेल्या पुरामुळे अडचणी निर्माण झाल्या. यामुळे ट्रॅक्टरमध्ये नेण्याचे नियोजन झा; मात्र ट्रॅक्टरही वाहून जाऊ लागल्याने ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने तिला ओढ्यापलीकडे पोहोचविले. मात्र १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी वैष्णवीला दोन तास लागले. यामुळे वाटेतच तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गांवर पाणीच पाणी, एका बाजूची वाहतूक पूर्ण बंद
विजयपूरहुन सोलापूरच्या दिशेने जाणारा रोड एका बाजूने बंद, तर दुसऱ्या बाजूची वाहतूक देखील काही वेळात बंद होण्याची शक्यता
सीना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावाजवळील ओढा ओव्हरफ्लो
ओढा ओव्हरफ्लो आणि सीना नदीचे पाणी पूर्णपणे राष्ट्रीय महामार्गांवर आल्याने वाहतूक प्रभावित
एका बाजूने दुतर्फी वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना कसरत करत वाट काढावी लागतेय
सकाळी 8.30 नंतर कुठे कोणता अलर्ट?
————-
(दुपारी १ नंतर यात बदल अपेक्षित)
ऑरेंज अलर्ट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक आणि पुणे घाट परिसर (इगतपुरी, कसारा, लोणावळा, खंडाळा)
यलो अलर्ट - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छ.संभाजीनगर, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसर (गगनबावडा, कोयना परिसर)
राज्यात पुढील आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता
६, ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी राज्यात पाऊस
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा एकदा निर्माण होणार असल्याने राज्यात पाऊस
दसरा मेळाव्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेच्या बैठकांचे सत्र सुरू आहे
यामध्ये दसरा मेळाव्याच्या आयोजना संदर्भात निर्णय घेतले जात आहेत यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा पावसाचा सावट असलं आणि शिवाजी पार्कवर चिखलाचा साम्राज्य जरी असलं तरी शिवतीर्थावरच मेळावा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना आणि पुढे दोन-तीन दिवस अशाच प्रकारे पावसाचा अंदाज वर्तवला जात असताना सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्णय घेतला आहे
पाऊस असो किंवा शिवाजी पार्क मैदानावर चिखल ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असून त्यासाठीची तयारी आज दुपारपासून सुरू होईल
या सगळ्या संदर्भात मागील आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली शिवाय काल सेना भवन येथे शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बैठक सुद्धा पार पडली
कुठल्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला असल्याची माहिती आहे
जायकवाडी धरणातून २ लाख क्युसेक विसर्ग; मुंगी गावात दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा. आजच्या युगात दवंडी अथवा दौंडी ही प्रथा हळूहळू लोप पावत असली, तरीही काही वेळा प्रशासनाला गावकऱ्यांना अलर्ट करण्यासाठी ही पारंपरिक पद्धत उपयोगी पडते. शेवगाव तालुक्यातील मुंगी गावात याचा प्रत्यय आला.
पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सरपंच
वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत यांनी जीवाची परवा न करता पुराच्या पाण्यातून 50 जणांना काढलं बाहेर.
हर हर महादेव चा जयघोष करत पुरात अडकलेले लोक निघाले बाहेर
सीना नदीला तिसऱ्यांदा पूर आल्यामुळं पुन्हा लोकांचं स्थलांतर
पुरामुळं उंदरगाव-वाकाव रोड वरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
ऋतुराज सावंत हे शिवसेनेचे माजी सोलापूर सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचे सुपुत्र तर माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत.
ऋतुराज सावंत सावंत यांचा पुरातून लोक बाहेर काढतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे
उजनीतून भीमा पात्रात विसर्ग वाढवला, उजनीतून भीमा नदीत 86 हजार 600 क्युसेकने विसर्ग. उजनीच्या 16 दरवाज्यातून केला जातोय विसर्ग. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात उजनी धरणातून 86 हजार 600 क्युसेकने विसर्ग केला जातोय. उजनी धर्माच्या 16 दरवाजातून हा विसर्ग केला जातोय. काल कमी करण्यात आलेल्या निसर्गात रात्रीपासून पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे. काल रात्री तो 50 हजार होता त्यानंतर रात्री अकरा वाजता तो 75 हजार करण्यात आला आणि आज सकाळी सहा वाजता वाढ करून तो 86 हजार 600 क्युसेकने इतका करण्यात आला आहे आणि यामध्ये देखील आणखी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे खळबंदा जलाशयाचा सेजगाव, परसवाडा, अर्जुनीला जाणारा कालवा फुटल्याने, परिसरातील शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात खळबंदा जलाशय आहे. या जलाशयातून जवळपास ५० ते ६० गावांना सिंचनाची सोय खरीप आणि रब्बी हंगामात होते. सततच्या पावसाने जलाशय तुडुंब भरले आहे. त्यातच तलावाचे पाझर पाणी कालव्याच्या माध्यमातून वाहत आहे. अशातच गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जमिनीतील ओलावा वाढला आहे. खळबंदा जलाशयाच्या माध्यमातून सेजगाव, अर्जुनी, परसवाडा, तसेच परिसरातील गावांना पाणी दिले जाते. तोच कालवा सेजगाव ते खळबंदाच्या दरम्यान फुटला. कालवा फुटल्याने आणि सध्या पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. दुसरीकडे जोपर्यंत हा कालवा दुरुस्त होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना पुढील सिंचनासाठी ताटकळत बसावे लागणार आहे.
मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता.
नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ज्ञानगंगा नदीत बुडून दोन युवक बेपत्ता झाले आहेत काल सायंकाळी हे दोन्ही युवक ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुरातून नदी पार करत असताना वाहून गेले अद्यापही या युवकांचा शोध लागला नसून आज सकाळपासून पुन्हा आपत्ती व्यवस्थापन पथक त्यांचा शोध घेत आहेत. करण गजेंद्र भोंबळे व वैभव ज्ञानेश्वर फुके असं बेपत्ता झालेल्या युवकांचे नाव असून ते नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरे यांच्या परिसरातील नाल्यांमधील तरंगणारा कचरा काढण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे
२९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विभागीय पातळीवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे
विशेष स्वच्छता मोहिमेत नागरिकांच्या सक्रीय सहभागाने मुंबई अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक करण्याचा महानगरपालिकेचा संकल्प आहे...
या विशेष स्वच्छता मोहिमेत निष्काळजीपणा अथवा टाळाटाळ करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) प्रमुख नाल्यांचे (कांदळवन क्षेत्र वगळून), तसेच नाल्याभोवतालचा परिसर, उघडी गटारे यांतील कचर्याचे संकलन केले जाणार आहे.
खडकपूर्णा जलशयाच्या सर्व 19 दरवाजातून 75 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु.
नदीकाठील नागरिक अलर्ट मोडवर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली.
सिंदखेड राजा व लोणार तालुक्याला पुराचा फटका.
नागपूर - पुणे - मुंबई जुना महामार्ग पुलावरून पाणी असल्याने गेल्या 16 तासांपासुन बंद.
नदीकाठील गावात प्रशासनासह नागरिकांनी काढली रात्र जागून.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सातही तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सातही तलावांत आता १४,३९,५८८ दशलक्ष म्हणजेच ९९.४६ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी वर्षभर पुरेल. यामुळे या वर्षी पाणीकपातीचे संकटही दूर होणार आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. १ ऑक्टोबरच्या रोजीच्या साठ्यानुसार वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पावसाळा, वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात करावी लागते. मात्र, या वर्षी सर्व तलाव ओसंडून वाहू लागल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे झालेलं नुकसान
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे 3 नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण जखमी झाले आहेत
जिल्ह्यातील एकूण 32 पशुधनाचा मृत्यू झाला आहे
यात मोठे दुधाळ जनावरे - 8
लहान दुधाळ जनावरे -22
ओढकाम करणाऱ्या जनावरे -2
248 कुक्कुट पक्षाचा मृत्यू झालाय
जिल्ह्यातील एकूण 147 घरांचे नुकसान झाले आहे
कच्चा घरांचे अंशतः नुकसान:- 129
कच्च्या घरांचे पुर्णतः नुकसान -7
पक्क्या घरांचे अंशतः नुकसान- 11
135 नागरिकांच्या घरात पाणी शिरले
जिल्ह्यातील 15 झोपड्या आणि एका गोठ्याचे नुकसान झाले
रात्रीपासून पडत असलेला ठाण्यातल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे... रात्रभर ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू होती. ठाण्यामध्ये रात्रीतून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता या पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक सद्यस्थितीत ठाण्यात सुरळीत पाहायला मिळत आहे.
मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस झाला आहे. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. आगामी काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. मध्य रेल्वेमार्गावर लोकल ट्रेन पाच ते दहा मिनिटं उशिराने धावत आहेत. हार्बर रेल्वेमार्गावरही लोकल ट्रेन पाच-दहा मिनिटं उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनसेवा सुरळीत आहे.
आज पहाटेपासून दक्षिण मुंबई आणि पूर्व व पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार वारेही वाहत आहेत. सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्यामुळे पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांना मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो.
बीडच्या आष्टी तालुक्याला देखील मुसळधार पावसाने दोन दिवस झोडपून काढल. रविवारी मुसळधार झालेल्या पावसाने आष्टी तालुक्यातील सीना आणि मेहेकरी नदीला पूर आला.. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी गावात काही शेतकरी आणि स्थानिक नागरिक अडकले होते. एनडीआरएफ च्या माध्यमातून बचाव कार्य पूर्ण झाले असून या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. आष्टी तालुक्यात मागील दोन दिवस आणि गत आठवड्यात झालेल्या पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झालेच मात्र अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. दरम्यान पूरस्थिती पाहता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख पीक. मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीनची लागवड करतात मात्र यंदा पाऊस आणि पुराने याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा आकांक्षाचा चिखल झाला आहे.परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील प्रदीप अंबोरे यांनी आपल्या १० एकर मध्ये सोयाबीन घेतले.पहिल्यांदा पाऊस नसल्याने सोयाबीन उगवलेले नाही पुन्हा कर्ज काढून दुसऱ्यांना सोयाबीन लागवड केली मात्र सतत पडलेल्या पाऊस आणि करपरा नदीला आलेल्या पुरामुळे शेंगा लागलेल्या आणि काही दिवस काढणी करायला आलेल्या सोयाबीन मध्ये गुडघ्या एवढा चिखल झालाय…त्यामुळे त्यांनी दरवर्षी प्रमाणे आपले सोयाबीन वर केलेल्या वर्ष भराच्या आर्थिक नियोजनाचा,मुलांच्या शिक्षणाचा,आशा आकांक्षाचा,चिखल झालाय आता दसरा दिवाळी कशी करायची लेकी बाळींना सणासाठी कसे आणावे असे एक ना अनेक प्रश्न प्रदीप यांना आणि त्यांच्या सारख्याच इतर शेतकऱ्यांना पडले आहेत त्यामुळे त्यांनी देवाभाऊ यांच्याकडे भरीव मदतीसाठी याचना केली आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे... यानंतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली नाही... यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. जर शेतकऱ्यांना मदत करायची नसेल तर राजकीय पर्यटन दौरे करता कशाला ??? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर सरकार जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे अशाही सुषमा अंधारे म्हणाल्या.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर तालुक्याला काल पावसानं झोडपलं. गेल्या चार दिवसात दोन वेळा पाऊस झाला. त्यामुळे शिवना नदीला पूर आला दाक्षायणी देवीच्या मंदिरात पाणी शिरलं.
तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे.आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे,ज्यांचे अती नुकसान झाले आहे त्यांना देखील वेगळी मदत मंदिर संस्थान आणि तेरणा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे यंदा मराठवाड्यावर अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. यावेळी तेरणा ट्रस्ट आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला धावून आलं आहे.
नाशिक शहरातील पावसाचा जोर काल सायंकाळपासून कमी झाला असला तरीही गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे, यंदाचा मोसमातील सर्वाधिक विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे, गोदामाईच्या पुरात नाशिक च्या पुराचे प्रमाण म्हणून ओळखला जाणाऱ्या दुतोंडया मारुतीच्या माथ्यावरून पाणी जात होते, रात्रीपासून पाणी काही प्रमाणात कमी झाल्यान दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यत पाणी आहे, सध्या गंगापूर धरणातून 10 हजार 988 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात असून अहिल्याबाई होळकर पुलापासून 11 हजार 210 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, पुन्हा पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असून पूर स्थितीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनाही रात्री उशीरा गोदावरी नदीच्या पुराची पहाणी करत काही नागरिकच्या भेटी घेत नुकसानीची पहाणी केली
साताऱ्यातील पश्चिम भारतातील डोंगर माथ्यावर तुरळक प्रमाणात अधून मधून पाऊस पडतो आहे. पूर्वेकडील भागात म्हणजे माण, खटाव, म्हसवड येथे ढगाळ वातावरण आहे. याठिकाणी देखील पावसाची रिमझिम कमी प्रमाणात आहे.
- बीड जिल्ह्यातील 17 धरणे 100 टक्के भरली असून, 2 धरणे ही 90 टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगाव धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.
- वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे 48 मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे.
- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती उदभवल्यास त्यांना स्थलांतरित करण्यात येईल. आष्टीमधून 60 नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे.
- सप्टेंबरपासून 2567 कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले. 10 लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी 8 कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
ठाण्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप, सद्यस्थितीत ठाण्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील प्पाणी महालावरून पाणी वाहत आहे. नर-मादी धबधब्याच्याही वरून वाहणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. तसेच बाजूला नैसर्गिकरित्या वाहणारा शिल्लक धबधबा आहे मोठ्या फेसाळणाऱ्या पाण्याने प्रवाहित झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अहिल्यानगर,आष्टी,कडा,जामखेड,कर्जत या भागता मुसळधार पाऊस होत असुन त्यामुळे सिना कोळेगाव प्रकल्पातुन 91 हजार 200 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग राञी पासुन वाढवुन 1 लाख 4 हजार 600 क्युसेकने सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी व नागरीकांनी सावधानता बाळगावी अस आवाहन प्रशासनाने केले आहे.
जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी काठची मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.. राक्षसभवन येथील शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर ही ऐतिहासिक मंदिरं सध्या पाण्यात आहेत. आज मध्य रात्रीपासून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला. परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून प्रशासनासह नागरिकांनी स्वतः आपले स्थलांतर सुरक्षित स्थळी केले आहे. गेवराई तालुक्यातील 45 गावांना या पाण्याचा धोका असल्याने किमान पंधरा दिवस पुरेल इतका जीवनावश्यक साठा नागरिकांनी सोबत घेऊन स्थलांतर केले आहे.
ठाण्यामधे सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. मुंबई शहरात पावसाची रिमझिम. पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पहाटेपासून पावसाची संततधार. संभाजीनगरमधे पावसाची उघडीप, मात्र पूरपरिस्थिती कायम
पालघर जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू होता ठिकठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. याच वेळी नवदेविंच्या दर्शनासाठी महिला भाविकांना डहाणूत घेऊन आलेली बस पुराच्या पाण्यात अडकून पडली . डहाणू - चरी - वाणगाव मार्गावर चरी जवळ रस्त्यावर आलेल्या पाण्यात बस अडकली . बस मधील 15 महिला भाविकांसह चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश . वसई येथील महिला भाविकांना घेऊन बस डहाणू तील संतोषी मंदिरात येत असताना बस अडकून पडली . डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन या सर्वांना पुरस्थितीतून सुखरूप बाहेर काढलं. यावेळी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख ही घटनास्थळी उपस्थित होते
नाशिक येथे गोदावरीला महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे. यावेळी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा शहरातील होळकर पुलावरून गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. नामदार महाजन यांनी पुराच्या ठिकाणी लोकांनी काठावर जाऊ नये ,विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले असून पूर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असल्याचे नमूद केले.
भारतीय हवामान विभाग (IMD)च्या अंदाजानुसार, आज मुंबईत ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. आज देखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरसह नजीकच्या भागासाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज दिवसभर ढगाळ आकाश राहील आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Mumbai Rains LIVE: पूर परिस्थिती भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कार्यकर्त्यांना आवाहन