Maharashtra Rain LIVE | चंदगड तालुक्यातील कोवाड बाजार पेठेत पाणी शिरलं

Mumbai Rains Forecast and Alert LIVE Updates | मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Aug 2020 04:49 PM
सांगलीत काल पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर आहे.
कोयना धरणात 63 tmc इतका पाणी साठा आहे. धरण परिचलन सूची नुसार कोयना धरणातील पाणी साठा 80 tmc चे वर गेले नंतरच कोयना धरणातून कोयना नदी मध्ये पुराचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी झाली आहे अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून कळवण्यात आली आहे.
कोल्हापूर- गेल्या 12 तासात पंचगंगेची पाणी पातळी केवळ दीड फुटांनी वाढली,

सध्याची पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट 7 इंच इतकी,

राधानगरी धरणाचे रात्री आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले ,

पाणीपातळी वाढण्याचा वेग काहीसा मंदावला,
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 4413 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. जिल्ह्यातील एकूण 1100 जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले; जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRF च्या आणखी दोन टीम पुण्याहून रवाना. कोल्हापूर जिल्ह्यात NDRF च्या एकूण 6 टीम कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील विविध भागात NDRF ची पथकं उद्या रवाना होणार.
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले. संध्याकाळी 7 वाजता 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले. 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 4413 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. जिल्ह्यातील एकूण 1100 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत; जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती.
मंत्रालयासमोर पुन्हा एकदा झाड कोसळल्याने एक बाजूची रस्त्यावरची रहदारी थांबली. मंत्री जितेंद्र आवाहड यांच्या घराजवळील झाड कोसळले. एक व्यक्ती यातून थोडक्यात वाचला.
चांदोली धरणातून 4400 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार : धरणातून 3000 तर वीजनिर्मिती केंद्रातून 1400 क्यूसेक्स असा एकूण 4400 क्यूसेक्स पाणी वारणा नदीत सोडण्यात येणार : आज दुपारी 2 वाजता पाणी सोडण्यात येणार
मुंबई उच्च न्यायालयाचं गुरूवारचं कामकाज तहकूब,

बुधवारी पावसामुळे अडकून पडलेला कोर्टातील कर्मचारी वर्ग सकाळी घरी पोहोचल्यानं घेतला निर्णय
राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जे जे रुग्णालयाच्या तळमजल्यावरील पाण्याचा निचरा झाला. लोकल ट्रेन सुरु आहेत : इक्बाल चहल, बीएमसी आयुक्त
पावसाने चांगलाच जोर धरल्याने पुण्यातून आत्तापर्यंत एनडीआरएफची 16 पथक महाराष्ट्रात रवाना झालेली आहेत. आठ जिल्ह्यात ही पथक तैनात केली गेलीत.

1. कोल्हापूर - 4 पथक
2. सांगली - 2 पथक
3. सातारा - 1 पथक
4. ठाणे - 1 पथक
5. पालघर - 1 पथक
6. मुंबई - 5 पथक
7. नागपूर - 1 पथक
8. रायगड - 1 पथक
मुंबईत विक्रमी पावसाची नोंद, चार तासात 300 मिमी पाऊस : मुंबई महापालिका आयुक्त
रत्नागिरी -
मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी ब्रीज वाहतूकीसाठी चालू करण्यात आला आहे. दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने स्थानिक प्रशासनाने हा ब्रिटिशकालिन जीर्ण पुल असल्याने त्याची पाहाणी करुन सुरक्षतेच्या दृष्टीने महामार्गावरील पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. आता पावसाचा जोर कमी झाल्याने नदीचे पाणी ओसरल्याने पुन्हा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे

ठाणे शहरात काल दिवसभरात 164 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर या पावसामुळे 18 पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या 27 पेक्षा जास्त ठिकाणी झाडे पडली. आज देखील रेड अलर्ट असल्यामुळे घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्तांनी केलं आहे.
भिवंडी- मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून अनेक दुकाने तसेच घरांमध्ये पाणी शिरले आहे. मात्र सध्या हे पाणी ओसरत असलं तरी अजूनही अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. ठाणे भिवंडी मार्गावर काल रात्री तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलं होतं व अजूनही या परिसरात एक ते दीड फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला आहे.
तळकोकणात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात डोंगरात भुसखनन होऊन डोंगरात झाडे कोसळून पडली तर डोंगराची माती लोकवस्ती पर्यत आली आहे. चेंदवण वेलवाडी जाणारी पायवाट बंद झाल्याने गावातील आठ घरांचा संपर्क तुटला असून तीन घरांना धोका कायम आहे. आठ घरांचा संपर्क तुटल्याने गणेशोत्सवाची तयारी कशी करावी असा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. चेंदवण गावातील वेलवाडी येथील नेरकरघाटी डोंगरात अनेक झाडे भुसखनन होऊन पडली असून डोंगर खचत असल्याने माती घरापर्यंत आली असून घरांना धोका निर्माण झाला आहे.
जे जे रुग्णालयात साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दक्षिण मुंबईत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जे जे रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाणी साचलं होतं.

बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक पूल पाण्याखाली जावून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले होते.बेळगाव गोवा मार्गावर देखील मलप्रभा नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे.शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले.अनेक ठिकाणी विजेच्या तारा,खांब आणि झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.जिल्ह्यात चोवीस तासात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.खानापूर तालुक्यातील चाळीस गावांचा खानापूर गावाशी असलेला संपर्क तुटला आहे.चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली असून नदी काठावरील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : पेडर रोड परिसरात भिंत कोसळली, भिंतीसह झाडंही उन्मळून पडल्याची माहिती, पेड रोड फ्लायओव्हर बंद
गेले तीन दिवस पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाने आज पुन्हा पहाटे जोर पकडला आहे. पहाटेपासून पावसाची संततधार सुरुच आहे. काल झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी आणि ग्रामीण भागातील बहुतेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी झाड पडली तर रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी जिल्ह्याशी संपर्क तुटला होता. सफाळे, केळवे, माहिम, पालघर, बोईसर, तारापूर, चिंचणी, वाणगाव, डहाणू, तलासरी, कासा, मनोर या भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. या पुरामध्ये अडकलेल्या काही लोकांना वाचवण्यात यशही मिळालं. पालघरमध्ये एनडीआरएफची टीम दाखल होऊन त्यांनी काही लोकांना रेस्क्यू ही केलं. पालघर जिल्ह्यात काल 264 मिमी पावसाची नोंद झाली तर महाराष्ट्रात सर्वाधिक डहाणू तालुक्यात 465 मिमी पाऊस झाला. आताही पाऊस सुरुच आहे.
गेल्या दोन दिवसात रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, महाड, पेण, माणगाव, पाली, नागोठणे, श्रीवर्धन भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर दोन दिवस झालेल्या पावसामुळे माणगाव तालुक्यातील सोन्याची वाडी येथे अडकलेल्या 86 नागरिकांना सुमारे 6 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, उरण तालुक्यातल्या जेएनपीटी बंदरातील जहाजात कंटेनर उतरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महत्वाच्या अशा तीन क्रेन्स दुपारी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय काल रात्री सुमारे 48 तासानंतर पावसाने अनेक भागात विश्रांती घेतली आहे.
गेल्या दोन दिवसात रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, महाड, पेण, माणगाव, पाली, नागोठणे, श्रीवर्धन भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर दोन दिवस झालेल्या पावसामुळे माणगाव तालुक्यातील सोन्याची वाडी येथे अडकलेल्या 86 नागरिकांना सुमारे 6 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, उरण तालुक्यातल्या जेएनपीटी बंदरातील जहाजात कंटेनर उतरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महत्वाच्या अशा तीन क्रेन्स दुपारी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय काल रात्री सुमारे 48 तासानंतर पावसाने अनेक भागात विश्रांती घेतली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्तर रत्नागिरीतील चिपळूण आणि खेडमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खेडची जगबुडी नदी आणि चिपळूणची वाशिष्टी नदी या दोन प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. नद्या सध्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर चिपळूण नजिकच्या वाशिष्टीचा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्तर रत्नागिरीतील चिपळूण आणि खेडमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खेडची जगबुडी नदी आणि चिपळूणची वाशिष्टी नदी या दोन प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. नद्या सध्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर चिपळूण नजिकच्या वाशिष्टीचा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीने आता 20 फुटांची पाणी पातळी ओलांडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत, मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसाबद्दल माहिती घेतली, आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन
कोल्हापूर : पंचगंगा नदीची धोकापातळीकडे वाटचाल, धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी, पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 2 इंचावर, कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली, शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता
काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, मुंबईसह उपनगरात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा, विनाकारण घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन
माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला असून काळ पूलावर जड वाहने थांबविण्यास मनाई करण्याबाबतही स्थानिक प्रशासनास कळविले आहे.
त्यामुळे पुराचे पाणी कमी होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येत असून लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे -निजामपूर-बोरवाडी-डालघर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन फक्त दिवसा लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. पर्यायी मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी नाही.
राज्य महामार्ग विभाग व पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसिलदार, माणगाव यांनी कळविली आहे.
सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे.

सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट इतकी

गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ndrf च्या आणखी सकाळी दोन पथक कोल्हापुरात दाखल होणार आहे.

आधीच्या दोन टीम आणि आताच्या दोन टीम अशा एकूण 4 टीम कोल्हापूर जिल्ह्यात असतील.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फूट 1 इंचावर पोहचली. पाणी पातळीत झपाट्याने वाढ, कोणत्याही क्षणी इशारा पातळी गाठण्याची शक्यता. जिल्ह्यातील 23 जिल्हामार्ग, 6 राज्य मार्गांवर पाणी, जिल्ह्यातील 100 बंधारे पाण्याखाली.
मिरा भाईंदर शहरात आज मुसळधार पावसाने काशीमिरा परिसरातील एकाचा बळी घेतला आहे. बुधवारी पहाटे पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. शहरातील अनेक भागात पाणी ही भरले होते. काशीमीरा परिसरातील महाजनवाडी, मिरा गावठाण येथे दोन जण वाहून जात होते. त्यातील एकाला स्थानिक रहिवाशांनी वाचवले तर दुसरा वाहून गेला. सकाळी त्याचा मृतदेह तेथेच जवळ असलेल्या नाल्यात अडकल्याचे आढळून आले. त्याच नाव राकेश धिरूभाई हरसोरा वय 47 वर्षे आहे. तो तेथीलच मिरा गावठाण येथील राहणारा आहे. त्या परिसरातील काही रिक्षा व काही दुचाकी वाहून गेल्याचे रहिवाशांनी संगितले आहे. सकाळी पाण्याचा प्रवाह एवढा होता कि, एका दुकानाच शटरही वाकल होतं.
पालघर येथे समुद्रातील वादळी वाऱ्याचा फटका बसून सातपाटीच्या किनाऱ्यावर येणारी "प्राजक्ता" ही मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळून फुटली. या अपघातात नौकेसह लाखो रुपयांचे साहित्य नष्ट झाले असून 15 मच्छीमारांचे प्राण वाचले आहेत.
वसई चर्चगेट मरीनलाईन्सच्या मध्यभागी 1 आणि 2 नंबरच्या ट्रॅकवरील रेल्वेची ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने आगीचा भडका उडाला होता. आज दुपारी 4 वाजून 58 मिनिटांची ही घटना आहे. घटनेच्या नंतर EMV रिपेअरिंग रेल्वेची गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली होती आणि दुरुस्तीचे काम ही युध्दपातळीवर सुरू होतं. चर्चगेट ते चर्नी रोड पर्यंत ट्रकवर ही काही प्रमाणात पाणी साचल्याने लोकल ह्या धीम्या गतीने धावत आहेत. अचानक ओव्हरहेड वायरच्या आगीचा भडका उडाला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.

कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे.
त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत
मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात दरड कोसळली, पोलिसांनी दरड हटवली आता वाहतूक सुरळीत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात दरड कोसळली, पोलिसांनी दरड हटवली आता वाहतूक सुरळीत.
माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला असून काळ पूलावर जड वाहने थांबविण्यास मनाई करण्याबाबतही स्थानिक प्रशासनास कळविले आहे.
त्यामुळे पुराचे पाणी कमी होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येत असून लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे -निजामपूर-बोरवाडी-डालघर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन फक्त दिवसा लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. पर्यायी मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी नाही.
राज्य महामार्ग विभाग व पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसिलदार, माणगाव यांनी कळविली आहे.
सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्हयातील संग्रामपुर तालुक्यात विजांच्या आवाजासह 1 तास पाऊस पडला. एकलारा गावातील 55 वर्षीय महिला शेतात काम करत असताना अंगावर विज पडून ठार.
कोल्हापूर जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पूल वाहतुकीसाठी बंद. सुमारे एकशे वीस वर्षांपूर्वीचा जूना पूल. पूलाच्या स्लॅबला पुराचे पाणी लागल्याने वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती. स्थानिक तालुका प्रशासनाचा निर्णय तर निपाणी-आजरा-आंबोली-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक देखील बंद.
मुंबई हायकोर्टा समोरचा सिग्नल तुटून पडला तर झाडंही उन्मळून पडलेत. वाहनांचं मोठं नुकसान.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी पुल वाहतूकीस बंद. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ. ब्रिटिश कालीन जुना पूल असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद.
यंदा परभणी जिल्ह्यात सुरूवातीपासूनच जोरदार पाऊस बरसतोय. मात्र, मागच्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती दिल्यानंतर आज दुपारपासून जिल्हाभरात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. परभणी, मानवत, सोनपेठ गंगाखेड, पूर्णा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे जिल्हाभरातील पिकांनाही दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे सर्वत्र कमालीचा गारवाही निर्माण झाला आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकलही अडकल्या होत्या. एनडीआरएफ जवानही मदतकार्यात गुंतले आहे. शिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासास मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरु आहे.

तर कोल्हापुरातही जोरदार पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्र सोडलं आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीशेजारच्या गावातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे. कोल्हापुरात धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.