Pragati Express : आता मुंबई-पुणे (Mumbai-Pune) असा ट्रेन प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कोरोना (Coronavirus) काळात बंद केलेल्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची (Pragati Express) सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. प्रगती एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं एक खास गिफ्ट दिलंय. प्रगती एक्स्प्रेसला आता व्हिस्टाडोम कोच असणार आहेत. ही ट्रेन पुण्याहून सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी रोज रवाना होईल तर संध्याकाली 4 वाजून 25 मिनिटांनी मुंबईहून पुण्याकडे रवाना होईल. आता व्हिस्टा डोम कोच असल्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास आणखी सुखकर होणार आहे. 


मध्य रेल्वे मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेसची सेवा आजपासून मुंबईत पूर्ववत करणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे प्रगती एक्सप्रेसची सेवा बंद करण्यात आली होती. ट्रेनला विस्टाडोम कोच असेल. ट्रेनला लिंक हॉफमन बुश (एलएचबी) कोच असणार आहेत. प्रगती एक्स्प्रेस ही मुंबई-पुणे मार्गावरील तिसरी ट्रेन आहे जिला व्हिस्टाडोम कोच जोडले जाणार आहेत. प्रगती एक्सप्रेस व्यतिरिक्त मुंबई-पुणे मार्गावरुन धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्सप्रेसमध्ये गाड्यांनाही व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या नेटवर्कमधील प्रगती एक्सप्रेस ही चौथी ट्रेन आहे, जी व्हिस्टाडोम कोचनं सुसज्ज आहे.


कसा आहे विस्टा डोम?


या विस्टाडोम कोचला तिन्ही बाजूंनी काचेच्या खिडक्या आहेत, हा कोच पूर्णपणे पारदर्शक आहे.  ट्रेन स्टेशनवरून निघून गेल्यावर लोक केवळ आतून दृश्ये पाहू शकत नाहीत तर त्यांची नोंदही करू शकतात. विस्टाडोम कोचचे छतही काचेचे आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान पर्वत आणि दऱ्यांमधून जाणारे सुंदर ढग, आकाशातील तारे आणि चंद्राची मंत्रमुग्ध करणारी दृश्ये लोकांना आवडतील. 


मिनी ट्रेन रुळावर परतण्यासाठी सज्ज


मुंबईजवळील माथेरान हिल स्टेशनवरील प्रतिष्ठित मिनी ट्रेन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे नॅरोगेज रेल्वे रुळांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तिची सेवा तीन वर्षांहून अधिक काळ स्थगित करण्यात आली होती. सेंट्रल रेल्वे (CR) च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 5 कोटी रुपयांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही एक शतकाहून अधिक जुनी हेरिटेज ट्रेन पुन्हा धावू लागली तर ती 2019 पूर्वीच्या कालावधीपेक्षा कमी असेल. प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल.