Mumbai Pune Expressway Accident :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघाताचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे. यातच पुन्हा एकदा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल प्लाझाजवळ आज (19 मे) पहाटे 3 वाजताच्या सुमारास कारचा अपघात झाला. यात एक लहान मुलीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंबईवरून पुण्याच्या दिशेने कार येत होती. रस्त्यावर वाहनांची फार गर्दी नसल्याने कार भरधाव वेगात होती. अपघात झालेला कार चालक देखील आपली कार वेगात चालवत होता. त्यामुळे समोर उभ्या असलेल्या टेम्पोला या भरधाव कारने जोरदार धडक दिली. जोरदार धडक दिल्याने मागच्या बाजूला अडकली. कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना काही कळायच्या आत ही घटना घडली. या कारमध्ये प्रवास करत असणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.   जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं आहे.


तीन आठवड्यांपूर्वी असाच अपघात


दरम्यान तीन आठवड्यापूर्वी याच परिसरात असाच अपघात झाला होता, तेव्हा तीन प्रवाशांचा जीव गेला होता. त्यावेळी चारचाकी थेट ट्रकला धडकली होती. अख्खी गाडी ट्रक खाली गेल्याचं तेव्हा पाहायला मिळालं होतं. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार जात होती, त्याचवेळी उर्से गावच्या परिसरात समोरच्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती त्यातील चालक आणि दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात अर्धी कार ट्रकखाली गेली होती. 


द्रुतगती मार्गावरील अपघातांची सत्र कधी थांबणार?


मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो. मात्र या मार्गावर अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. 


संबंधित बातमी-


Pune-mumbai Express Highway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात का होतात? 'या' कारणांमुळे हा मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा