मुंबई: मुंबईतील ओला उबर संघटनांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्याने संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.येत्या 17 तारखेपासून संप सुरु करणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे. तर 19 तारखेला परेलमधून निघणारा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.


ऑनलाईन टॅक्सीचे कमीत कमी भाडे 100 ते 150 रुपयांच्या दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे 18 ते 23 रुपये भाडे करावे, कंपनीने नवीन वाहनं बंद करुन सध्या असलेल्या वाहनांना समान काम द्यावं, या ओला-उबर चालकांच्या मागण्या आहेत.

मुंबईतील ओला आणि उबर टॅक्सी चालकांनी यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी संप पुकारला होता. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह बैठकीनंतर आणि दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना त्रास होऊ नये यामुळे बाराव्या दिवशी संप मागे घेण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा टॅक्सीचालकांनी संपाचे हत्यार उपसला आहे.

याबाबत ओला उबर चालक संघटना उद्या पत्रकार परिषद घेणार असून, पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.