एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 14 नोव्हेंबर 2018 | बुधवार

  1. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येण्याची चिन्हं, सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप 


 

  1. नोव्हेंबर अखेरपर्यंत वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर कायद्याच्या कसोटीवर टिकेल तेच आरक्षण आमचं सरकार देणार, मंत्री गिरीष महाजनांचं आश्वासन, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना उपोषण मागे घेण्याचीही विनंती 


 

  1. मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मात्र काही लोकांनी ते काढून घेतलं, योग्यवेळी नावं सांगू, एबीपी माझाशी बोलताना नारायण राणेंचा आरोप


 

  1. साताऱ्यात सज्जनगडावरुन दाम्पत्याची दरीत उडी घेऊन आत्महत्या, 4 वर्षाच्या मुलाला गडावर ठेवून आई-वडिलांनी आयुष्य संपवलं


 

  1. दुष्काळाच्या मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात, 27 नोव्हेंबरला औरंगाबादेत दंडुका मोर्चा, सरकारला जाब विचारणार 


 

6.    समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यास माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडीच्या  श्रीहरी अणेंचा विरोध, शिवसेनेने विदर्भासाठी कोणतही योगदान दिलं नसल्याचाही आरोप 

  1. दिल्लीतल्या सफदरजंग स्टेशनवरून रामायण एक्स्प्रेस रवाना, अयोध्या ते रामेश्वरमपर्यंत 16 दिवसांचा प्रवास करणार, रामायणातल्या ठिकाणांची सफर घडवणार, यात्रेकरुंसाठी श्रीलंकेचा पर्यायही उपलब्ध


 

  1. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या जयंतीनिमित्त देशभरात बालदिनाचं सेलिब्रेशन, गूगलचंही आकर्षक डूडल, एबीपी माझावरही भरगच्च कार्यक्रम, राज ठाकरेंच्या बच्चेकंपनीशी ऐसपैस गप्पा


 

9.    काश्मीर सांभाळण्याची पाकची कुवत नाही, क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा पाकिस्तानला घरचा आहेर, काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याचीही मागणी

  1. अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत, इटलीतल्या लेक कोमोत कोंकणी पद्धतीनं विवाह सोहळा, दोन्हीकडच्या कुटुंबातील 30 सदस्यांची उपस्थिती


 

*BLOG* लेखिका कविता ननवरे यांचा बालदिनानिमित्त विशेष ब्लॉग, बालपणाचं बोन्साय अर्थात मोबाईलच्या विळख्यातलं बालपण https://goo.gl/2ri5xz

*बालदिन विशेष* : ऐसपैस गप्पा राजकाकांशी... पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*