बुलढाणा : शरद पवार यांचे खंदे समर्थक व राज्याचे जलपुरुष म्हणून ओळख असलेले भारत भाऊ बोंद्रे (Bharat Bhau Bondre) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने चिखली येथे अखेरचा श्वास घेतला. 1967 पासून ते शरद पवार यांच्यासोबत होते. शरद पवारांचे एकनिष्ठ साथीदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होताना दिसत आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार
भारत भाऊ बोंद्रे हे 1972 साली प्रथम चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी चिखली विधानसभेचे प्रतिनिधित्व केलं होतं. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांनी पाटबंधारे मंत्री, उद्योग मंत्री व शिक्षण मंत्री म्हणून पदे भूषवली होती. पाटबंधारे मंत्री असताना ते बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प, पेनटाकळी प्रकल्प व जिगाव प्रकल्पाचे ते प्रणेते होते. यासह त्यांनी राज्यातील शेकडो प्रकल्पांना त्यावेळी मंजुरी व गती दिली होती. त्यामुळे त्यांना राज्यात "जलपुरुष" म्हणूनही ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनाने बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या उभारणीत भारतभाऊंचे मोठे योगदान
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचंही आज निधन
सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी पन्नालाल सुराणा यांनी अखेरचा श्वास घेतलाय. नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.संपूर्ण आयुष्य समजासाठी देणाऱ्या साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधणानंतर त्यांचे पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत त्यांचा जन्म झाला होता. बार्शीत शाळेत असताना ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. तर महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते.शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केलं आहे. त्याच्या या अकाली निधनाच्या बातमीने सोलापूरसह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: