Mumbai Mono Rail  :  चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल (Mumbai) अडकून पडल्याची घटना घडली आहे. यानंतर एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे सव्वा तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान, अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांचा जीव टांगणीला लागला. अशातच मोनोरेलमध्ये अडकलेल्या एका आजोबांनी अंगावर शहारा आणणारा थरार सांगितला आहे. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

आजोबांनी सांगितला थरार

चारची ट्रेन होती, ती पाच वाजून वीस मिनीटांनी आली. या गाडीमध्ये लोड इतका होती की विचारुच नका. लोकल ट्रेनमध्ये जशी गर्दी होती. गाडीचा ड्रायव्हर चांगला होता, त्याने हळूहळू गाडी आणली, पण इथं आल्यावर गाडी एका बाजूला कलल्याची माहिती मोनोरेलमधून सुखरुप सुटका झालेल्या आजोबांनी दिली. हे सांगत्ना त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सगळे पोलीस, अग्निशाम दलाचे अधिकारी, अॅम्ब्युलन्सवाले आल्याची माहिती त्यांनी दिली. सगळ्यांना हळूहळू बाहेर काढण्यात आले. आता मी मुलीच्या घरी जाणार आहे. तिथं आराम करेन मग माझ्या घरी जाईल अस ते म्हणाले. माझ्यावर देवाची कृपा असल्याचे आजोबांनी सांगितले. माझ्या वडिलांना सर्वांनी मदत करुन बाहेर काढले त्याबद्दल अधिकारी आणि प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. 

तांत्रिक बिघाड झाला आणि ही ट्रेन जागीच थांबली

मुंबईत एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे मोनोरेलसंबधी जीवघेणी घटना घडली चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मोनोरेल जागीच थांबली. सुमारे सव्वा तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान, अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांचा जीव टांगणीला लागला. त्यामध्ये भीतीने गांगलेल्या प्रवाशांनी हात जोडल्याचे दिसून आले तर एका प्रवाशाने काच फोडून मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. चेंबूर ते भक्ती पार्क अशा धावणाऱ्या मोनोरेलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि ही ट्रेन जागीच थांबली. मोनोरेल एसी असल्याने दरवाजे बंद होते. मोनोरेल बंद झाल्यानंतर आधी आतील एसी बंद पडला. त्यामुळे आतील प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरू झाला.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Mono Rail : प्रवाशांचा जीव गुदमरला, भीतीने हात जोडले, तर एकाने काच फोडली; मोनोरेलचा थरार अन् सव्वा तासानंतर मिशन फत्ते