Mumbai Missing School Bus Highlights : सांताक्रूझमधील पोदार शाळेची बस सापडली, विद्यार्थी सुखरूप

सांताक्रूझमधील पोदार शाळेची बस विद्यार्थ्यांसह बेपत्ता आहे. दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांसह निघालेली बस अद्याप बेपत्ता आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Apr 2022 06:09 PM

पार्श्वभूमी

मुंबई :  शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अजूनही न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली आहे. सांताक्रूझमधील पोद्दार शाळेची ही बस आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने...More

परिवहन मंडळाचे मंत्री अनिल परब यांनी ट्वीट करत दिली माहिती

सांताक्रूझ येथील पोदार शाळेची बस बेपत्ता प्रकरणी मी पोलीस आयुक्त, डिसीपी या पोलीस यंत्रणांसह शाळेच्या प्रशासनाशी तातडीने बोललो आहे. त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली. विद्यार्थी सुखरूप असून आपापल्या पालकांकडे पोहचले आहेत. चिंता करण्याचे कारण नाही, असे पोलीस, शाळा यांनी सांगितले आहे. जरी असे असले तरी संबंधित ड्रायव्हर, बसचा कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा, असे शाळेच्या प्रशासनाला सूचित केले आहे, अशी माहिती परिवहन मंडळाचे मंत्री अनिल परब यांनी ट्वीट करत दिली आहे.