मुंबई : मुंबई मेट्रोची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र काही थोड्या वेळानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. वर्सोव्याकडे येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती घाटकोपर आणि जागृतीनगर स्थानकादरम्यान थांबवण्यात आली होती. त्यानंतर मेट्रोमधील सर्व प्रवाशांना जागृतीनगर स्थानकात उतरवण्यात आले.
सर्व प्रवाशांना जागृतीनगर स्थानकातच थांबाव लागल्याने त्यांचा मोठा खोळंबा झाला होता.