मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बऱ्याच सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. यात काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर वायफाय सुविधेसह हार्बर लाईनवर डब्यांची संख्याही आजपासून वाढवण्यात येणार आहे.


 

मुंबई सीएसटीमध्ये एसी डॉरमेटरी, पाण्यासाठी प्युरीफिकेशन प्लांट, दिव्यांग प्रवाशांसाठी बायो टॉयलेटसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. कुर्ला आणि ठाण्यात डिलक्स टॉयलेटसारख्या सुविधेसह महालक्ष्मी स्थानकात पेड टॉयलेटची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. कल्याण आणि गोवंडीमध्ये नवीन टॉयलेट सुरू करण्यात येणार असून खार रोडवर नम्मा टॉयलेटची नवी सुविधा पुरवली जाणार आहे.

 

याशिवाय बोरिवली स्थानकावर नवीन बुकिंग ऑफिससोबत नवी इमारतही प्रवाशांच्या सेवेत रूजू होईल. तसंच नालासोपारा गोरेगाव येथेही नव्या बुकिंग ऑफिसची सोय करण्यात आली आहे.

 

वायफाय सेवा या स्थानकांवर

कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर सेंट्रल , बांद्रा टर्मिनस, दादर पश्चिम, चर्चगेट, बांद्रा आणि खार रोड स्टेशनवर मोफत वायफाय सेवा दिली जाणार आहे.

 

मुंबईकरांसाठी आजपासून या सुविधा

*हार्बर मार्गावर 12 डब्यांची सेवा

*अंधेरी स्थानकावर हार्बर मार्गावरील 12 डब्यांच्या लोकलसाठी 2 प्लॅटफॉर्म

*गोरेगाव स्थानकात नवीन डेक आणि बुकिंग ऑफिस

*कर्जत, शहाड. कुर्ला, किंग सर्कल, रे रोड आणि चेंबूरमध्ये फूटओव्हर ब्रिज

*वसई रोड आणि नालासोपारा येथे फूटओव्हर ब्रिज आणि एस्केलेटर

*याशिवाय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत दादरमध्ये एक गार्डनही बनवले जाणार आहे.

 

https://twitter.com/Narendra_IRTS/status/767548374790836224