"हात लागला अन् बाऊ केला" म्हणजे काय याचा प्रत्यय मुंबई विमानतळावर आला. मुंबईपासून अवघ्या दीडशे किलोमीटरवर असलेल्या पुण्यात कन्हैयाची सभा होती. त्यासाठी कन्हैयानं विमानानं प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पण विमानात बसल्यानंतर गळा दाबण्याचा प्रयत्न केला. असा दावा कन्हैयानं केला पण पोलिसांच्या दाव्यामुळे कन्हैयाची नौटंकी उघड पडली. कारण कन्हैयावर हल्ला झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ज्यांच्यावर कथित हल्ल्याचा आरोप झालाय ते मानस ज्योती. कोलकात्यातील टीसीएस या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनिअर आहेत. कंपनीच्या कामानिमित्त कोलकाताहून मुंबईमार्गे ते पुण्याकडे येत होते. त्याचवेळी हा प्रकार घडला.
कन्हैयाला चुकून हात लागल्याचा दावा मानस ज्योती यांनी केला असून माझ्यावरील आरोप पब्लिसिटीसाठी केल्याचंही मानस यांनी म्हटलं आहे.
कन्हैयावर हल्ल्याची बातमी आल्यानंतर मग राजकीय पक्षानंही त्यात उडी घेतली. हातातील काम सोडून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड थेट विमातळावर दाखल झाले आणि त्यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.
प्रवासादरम्यान हाताला हात किंवा धक्का लागणं काही नवीन नाही. कन्हैया भाषणात संवादाची भाषा करतो. मग एकट्या मानस ज्योतीबरोबर कन्हैयानं संवाद साधून वाद का मिटवला नाही?
स्टंटबाजी आणि प्रसिद्धीसाठी कन्हैयानं नौटंकी तर नाही ना? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थितीत होतो.
VIDEO: