Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दिलासा कायम असणार आहे. दरम्यान, वानखेडेंनी हा खटला रद्द करण्यात यावा, तसेच कोणत्याही कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 


 


ED नं वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी कालावधी मागितला



ऑक्टोबर 2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. या प्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) दिल्लीकडे गुन्हा वर्ग केला आहे. तर या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. CBI नं दाखल केलेल्या FIR च्या आधारावर मुंबई ईडीनं ECIR नोंदवला आहे. ED नं वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी कालावधी मागितला आहे. 27 मार्चला केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यावर युक्तिवाद करणार आहेत.


 


कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरण नेमकं काय आहे? 


बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझ ड्रग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर आणि मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. तसेच कारवाई करण्यात आली होती. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरुन आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.


 


समीर वानखेडेंच्या तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह


या कारवाई दरम्यान, एनसीबीकडून आर्यन खानसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी आर्यन खानची निर्दोष सुटका झाली. तर समीर वानखेडे यांच्या तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत भ्रष्टाचारासह अनेक आरोप करण्यात आले. त्या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्सप्रकरणात अनेक दिवस तुरुंगात होता. त्यानंतर, मे 2022 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली.  


 


हेही वाचा>>>


CM Eknath Shinde : भराडी देवीच्या यात्रेसाठी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडले, उद्यापासून आंगणेवाडी यात्रेला सुरुवात