रायगड : सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामण देवी येथे रात्री दरड आणि माती कोसळली. महामार्गाच्या मध्यभागी मोठमोठे दगडी आल्याने वाहतूकीसाठी कशेडी घाट बंद ठेवण्यात आला. रात्रभर एल ॲंड टी कंपनी मार्फत दोन जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील माती आणि दरड बाजूला काम सुरु ठेवण्यात आले आताही काम सुरु आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असल्याने मार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असून धामणदेवी धडक असलेल्या ठिकाणापासून लोहारेपर्यंत किमान सहा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे.




अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या

कोकणात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्री साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात महामार्गावरील धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दरड कोसळली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. काल रात्रभर पासून आतापर्यंत दरड उपसण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती घटनास्थळावरुन प्राप्त झाली आहे. मध्यभागी मोठमोठे दगडी आल्याने वाहतूकीसाठी कशेडी घाट बंद ठेवण्यात आला. रात्रभर एल ॲंड टी कंपनी मार्फत दोन जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील माती आणि दरड बाजूला काम सुरु ठेवण्यात आले आताही काम सुरु आहे. वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असून धामणदेवी धडक असलेल्या ठिकाणापासून लोहारे पर्यंत किमान सहा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय.



महामार्गावरील खेड येथील जगबुडी - नारिंगी नदी धोक्याच्या पातळीवर

काल सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणारी नारंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगबुडी नदीची इशारा पातळी 6 मीटर तर धोका पातळी 7 मीटर आहे. दिवसभर सह्याद्रीच्या खोऱ्यात संततधार पाऊस सुरु असल्याने काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 6.5 मीटर पर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्या चिंतेत भर पडली आहे.

एका बाजूला जगबुडीचे पाणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या नारिंगी नदीच्या पाण्याचीही पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली की शहराला कधी पुराचा वेढा पडेल हे सांगता येत नाही. येथील व्यापाऱ्यांचा हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे जगबुदी आणि नारिंगी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागताच व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरु केली आहे.

पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह नसल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पाणी पात्रात वाढ झाल्याने नदी पात्र सोडून वाहत असल्याने शहरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे.

कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळीत वाढ
रायगड रोहा शहरालगत वाहणारी कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढत आहे. या नदीची इशारा पातळी 23 मीटर (ढोह तलाव बंधारा) तर धोका पातळी 23.95 मीटर आहे. दिवसभर संततधार पाऊस सुरु असल्याने काल रात्री कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी 23.40 मीटर पर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन यांच्या चिंतेत भर पडली.प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चिपळूण शहरातील वाशिष्टी नदी पात्राचे पाणी बाजारपुलाला लागले
सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण वाशिष्टी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने शहरातील नवीन असलेल्या बाजार पुलाला पाणी लागले. वाशिष्टी नदीला कोयना धराणाच्या पाण्याचा विसर्ग असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते.

जिल्ह्यातील छोट्या धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यातील छोटी छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणे ओव्हरफ्लो होऊ लागल्याने धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.त्यामुळे त्यामुळे आजूबाजूच्या नद्यांच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. नद्याच्या बाजूला असणाऱ्या गावाना सर्तकतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.