MNS Padyatra :मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक; रायगड आणि रत्नागिरीत मनसेची पदयात्रा, यात्रेचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 27 Aug 2023 11:51 PM
जत तालुक्यातील समता आश्रम शाळेतील 80 विद्यार्थ्यांना विषबाधा, मुलांवर तातडीनं उपचार सुरु

जत तालुक्यातील उमदीमधील समता आश्रम शाळेतील 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार 


मुलाना दिलेल्या बासुंदीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज


 उलटी, मळमळचा त्रास सुरु झाल्यानंतर  मुलांना
माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने केले दाखल


जास्त त्रास होत असलेल्या 10 मुलांना मिरज सिव्हील कडे उपचारासाठी हलवले

MNS Jagar Yatra: 14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा; मनसे आमदार राजू पाटील यांच्या जागर यात्रेला सुरुवात

MNS Jagar Yatra: 14 वर्षे वनवास रामाचा,  17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा अशा घोषणा देत मनसे आमदार राजू पाटील कोकण जागर यात्रेतून पायी चालत जात आहेत. मनसेच्या कोकण जागर यात्रेला सुरुवात झाली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागर यात्रा सुरू झाली असून  नागोठणे ते खांब 15  किलोमीटर  पायी जागर यात्रेला सुरुवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग गेली 15 वर्षे रखडलेला आहे या मार्गामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  भाजपा बरोबरच मनसे देखील आता या महामार्गावर आक्रमक झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीमध्ये कोकणवासियांसोबत संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील मुंबई गोवा महामार्गावर कोकण जागर यात्रा करत आहेत

 MNS:  मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा 'जागर', पाहा यात्रेचे ड्रोन फोटो

 MNS: अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते खारपाडा पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पाहा यात्रेचे ड्रोन फोटो

MNS:  रस्ता पूर्ण करा नाहीतर यंदाच्या निवडणुकीत कोकणी माणूस चांगला इंगा दाखवेल : बाळा नांदगावकर

MNS:  मनसे नेते बाळा नांदगावकर तरणखोप येथून पदयात्रेला सुररवात केली आहे.  तरणखोप ते  कासूपर्यंत जाणार आहेत. सरकारने आता तरी मनावर घेऊन हा रस्ता दिलेल्या वेळेत पूर्ण करावा नाहीतर यंदाच्या निवडणुकीत कोकणी माणूस चांगला इंगा दाखवेल अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझा शी बोलताना व्यक्त केली आहे.

MNS Padyatra:  मनसेच्या जागर यात्रेल सुरूवात

MNS Padyatra:  मनसेच्या जागर यात्रेल सुरूवात झाली आहे.  अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात झाली. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत.

पार्श्वभूमी

रत्नागिरी: अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी (Mumbai Goa Highway) आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला थोड्याच वेळात सुरूवात होणारय.  अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात होतेय. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत. 


दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली आहे. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.  


मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील 8 वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेचा समारोप कोलड येथे राज ठाकरेंच्या भाषणाने होणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.  



  • अमित ठाकरे – पळस्पे फाटा ते खारपाडा 

  • बाळा नांदगावकर – तरणखोप ते कासू 

  • संदीप देशपांडे – निवळी ते वांद्री

  • राजू पाटील – नागोठणे ते खांब


राज ठाकरे यांनी दिला होता इशारा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पनवेलमध्ये मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका टीप्पणी केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश देखील राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेकडून वांरवार मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्याला हात घातला जात आहे. पण तरीही या महामार्गाची अवस्था जैसे थेच आहे. त्यामुळे मनसेचे हे आंदोलन तरी यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.