Mumbai CST : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसटी) मोठा अपघात टळला आहे. प्लॅटफॉर्म क्लीन करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली आहे. मोटारमनने वेळीच सावधान होत जाग्यावर लोकल थांबवल्यानं मोठा अपघात टळला आहे. या क्लीनींग मशीनमध्ये अनेक मोठ्या ज्वलनशील बॅटरीज होत्या. यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता होती. 

प्लॅटफॉर्म क्लीन करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली

मुंबईच्या सीएसटी स्थानकात मोठा अपघात टळला आहे. प्लॅटफॉर्म क्लीन करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली होती. वेळीच लोकल जाग्यावर थांबवल्याने अनर्थ टळला आहे. ट्रॅकवरुन ही मशीन बाहेर काढायला वेळ लागल्यानं बराच वेळ लोकल स्थानकाच्या बाहेर खोळंबली आहे. सीएसटी स्थानकातील फलाट क्रमांक 7 वर ही घटना घडली आहे. मुंबईच्या सीएसटी स्थानक हे कायम गरबजलेले स्थानक असते. दररोड मोठ्या प्रमाणात प्रवाशांची या स्थानकावर मोठी गर्दी असते. देशातील सर्वात मोठ्या गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी सीएसटी हे एक स्थानक आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

देशातील सर्वात जास्त गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या स्थानकाला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. युनेस्कोने 7 जुलै 2004 साली या रेल्वे स्टेशनला आपल्या जागतिक वारसा यादीत समावेश केला होता. या रेल्वे स्टेशनच्या रचनेवर व्हिक्टोरियन आणि मुघल वास्तुकलेचा प्रभाव आहे. सीएसटीची रचना ब्रिटनमधील अनेक रेल्वे स्थानिकांशी मिळती जुळती आहे. ब्रिटिशांच्या काळात म्हणजेच 1887 मधील व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) नावाच्या या स्टेशन इमारतीच्या बांधकामासाठी त्यावेळी 16.13 लाख रुपये खर्च आला होता. भारतीय वास्तुकला लक्षात घेऊन गॉथिक शैलीत ही इमारत बांधण्यात आली आहे. या वास्तूचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा मध्यवर्ती घुमट, ज्याच्या वर 16 फूट 6 इंच मोठी मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतीय रेल्वेचे सर्वात भव्य इमारत असलेले रेल्वे स्टेशन आहे. युनेस्कोच्या यादीत भारतातील 40 स्थाने समाविष्ट आहे. ज्यात  32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्रित निकष स्थान आहेत. युनेस्कोच्या यादीत सर्वाधिक स्थानकांची नोंद झालेल्या देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे. या यादीत चीन आणि इटली या दोन्ही देशांच्या सर्वाधीक 55 स्थाने समाविष्ट आहे.  

महत्वाच्या बातम्या:

18 वर्षांपूर्वी सीएसएमटीला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा, जाणून घ्या गौरवशाली इतिहास