Mumbai Corona Update :  राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये थोड्याफार प्रमाणात घट होत असल्याचे चित्र असले तरी मुंबईतील कोरोना रूग्णांमध्ये मात्र वाढ होत आहे. आज मुंबईत 155 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. गुरूवारी मुंबईत 139 तर बुधवारी 124 रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आज मुंबईत एका आणि ठाण्यात एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  
 
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या 898 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. आज 116 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरे होण्याचा दर आता 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 1040870 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  मुंबईत कोरोना रूग्ण वाढीच्या दुप्पटीचा दर 5895 दिवसांवर पोहोचला आहे.  मुंबईत कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी नव्याने आढळणाऱ्या रूग्णांमध्ये तीव्र लक्षणे नसल्याचे समोर आले आहे. परंतु, रोज वाढणाऱ्या रूग्णांमुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 


आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार, आज मुंबई महानगरपालिका परिसरात 155, ठाणे एक,  ठाणे महानगर पालिका परिसरात 12, नवी मुंबई मनपा आठ, कल्याण डोंबवली मनपा एक, उल्हासनगर मनपा शून्य, भिवंडी निजामपूर मनपा एक, मीरा भाईंदर मनपा चार, पालघरमध्ये एक, वसईविरार मनपा एक, रायगड दोन आणि पनवेल मनपा परिसरात 12 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. ठाणे आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. 






दरम्यान, गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात आज 263 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,029 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतके झाले आहे. 


राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1455 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 898 सक्रिय रुग्ण हे मुंबईत असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 266 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,09,470 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. 


देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही वाढ 0.49 टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 827 नवे रुग्ण आढळले होते तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.