Aaditya Thackeray :  शिवसेना नेते (shiv Sena ) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यात बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यसभेच्या  महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे आणि याच दिवशी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु, राज्यसभेच्या मतदानाची तारीख काल जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  


आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे.  10 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, 10 जून रोजी होणाऱ्या मतदानामुळे आदित्य ठाकरे आपल्या दौऱ्यात बदल करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या 10 जून रोजीच्या दौऱ्याची तारीख बदलल्यानंतर अयोध्या दौऱ्याची नवीन तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या  दौऱ्याआधिच शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीची आरती होणार आहे. तसेच रामलल्लासह इतर देवतांचेही आदित्य ठाकरे दर्शन घेणार आहेत. अयोध्येत पोहोचलेल्या या पदाधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी केली असून तेथे आरती देखील केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ऐनवेळी सभा घेण्याचं ठरवल्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून सभास्थळ, होर्डिंग लावण्याच्या जागा याची पडताळणी केली जाणार आहे. शिवाय हॉटेल बुकिंग, भाविकांची राहण्याची सोय या सर्व गोष्टींची चाचपणी होणार आहे.


येत्या 5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील अयोध्या दौरा आयोजित केला आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे जात असल्यामुळे शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना जय्यत तयारी करत आहे. काका अयोध्येत जाण्याआधीच पुतण्याचे होर्डिंगही लागले आहेत, तेही काकाच्या विरोधात, त्यामुळे अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने काका आणि पुतण्याचा अयोध्या दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.  या पोस्टरबाजीतून शिनसेनेने 'असली आ रहा है, नकली से सावधन' असे लिहून राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.   


आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याआधी शिवसेनेने पोस्टरबाजीतून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 'असली आ रहा है, नकली से सावधन' असा आशय असणारे अनेक पोस्टर आयोध्येत लावण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर मनसेकडूनही अयोध्येत पोस्टर लावण्यात आले होते. 'राज' तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी, चलो अयोध्या...' असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं. 


महत्वाच्या बातम्या 


शिवसेना मनसेतील वाद थेट अयोध्येत? 'असली आ रहा है, नकली से सावधान' शिवसेनेची पोस्टरबाजी


Raj Thackeray : खबरदार! माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलाल तर..., राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम