मुंबई : मुंबईतील गुमास्ता कामगारांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. गुमास्ता कामगारांच्या विविध मागण्यांबाबत मालकांच्या संयुक्त कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा न झाल्याने मुंबई गुमास्ता युनियननं बेमुदत संपाचं शस्त्र उपसलं आहे. त्यामुळे मुंबईतील कापड बाजारातील उलाढाल थंडावणार आहे.

मुंबई गुमास्ता युनियनकडून मागच्याच आठवड्यात बोनस, ग्रॅज्युईटी, वेतनवाढ अशा विविध मागण्यांसाठी दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. मात्र त्या संपाचा कोणताच परिणाम दिसून न आल्यानं आता बेमुदत संप पुकारण्यात आला.

कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास मालक तयार नसल्याने अखेर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हा संप यशस्वी झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची शक्‍यता आहे.

संबंधीत बातम्या :

मुंबईच्या कापड बाजारातील गुमास्ता कामगार आजपासून संपावर