Mumbai accident: मुंबईतील विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. रात्री 12:30 च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या कारचालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने फुटपाथवरील झाडाला गाडी जोरदार धडकली व काही अंतरावर जाऊन पलटी झाली. यात दोन जण ठार झाले असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल समोर रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी कार झाडाला धडकत पलटी झाल्याने चालक सिद्धार्थ ढगे व त्याच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र रोहित निकम हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. 


भरधाव वेगात कार धडकली, गाडीचा चुराडा


सध्या कार अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून  मुंबईतील विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल समोर बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कारआधी जोरात झाडाला धडकली. व त्यानंतर काही अंतरावर जाऊन पलटी झाली. या अपघातात कारचा चुराडा झाला असून वाहन चालकासह त्याचा मित्र असा दोघांचाही मृत्यू झालाय. 


उपचारानंतर डॉक्टरांनी केले मृत घोषित 


विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल समोर रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेत कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. यात सिद्धार्थ ढगे व त्याचा मित्र रोहित निकम हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच लोकांनी जवळच्या  राजावाडी रुग्णालयात दोघांना उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे.