मुंबई : मुंबईला वीज पुरवढा करणाऱ्या बेस्टच्या वीजदरात कपात करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक मंडळाने बेस्टला तसे आदेश जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन दिवाळीत बेस्टने भाडेकपातीचं गिफ्ट दिलं आहे.
बेस्टची ही भाडेकपात 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नव्या वीजदरांमध्ये मुंबईतील बेस्टच्या वीज ग्राहकांना 4.13 रुपये प्रति युनिट दराऐवजी 3.92 रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टच्या वीजदरात तब्बल 7 टक्क्यांनी कपात केल्याने बेस्टवर त्याचा बोजा पडणार आहे. बेस्टने प्रस्ताव दिलेल्या महसुली खर्चालाही वीज नियामक आयोगाने लाल कंदील दाखवल्याने बेस्टसमोर अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाने काही दिवसांपूर्वीच टाटा पॉवर आणि रिलायन्सचेही वीजदर जाहीर केले होते. मुंबईतील तीनही वीज पुरवढादार कंपन्यांच्या दरातील तफावत कमी करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. दरम्यान बेस्टचे वीजदर 2017-18 मध्ये 7 टक्के, 2018-19 मध्ये 6 टक्के, 2019-20 मध्ये 5 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तसंच बेस्ट परिवहनची तूट भरुन काढण्यासाठी वीज ग्राहकांकडून वसूल केलेले 3,115 कोटी रुपयेही ग्राहकांना परत करावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या :
आता एनओसीशिवाय वीज कनेक्शन मिळणार!
मुंबईतील वीजदर जाहीर, रिलायन्सपेक्षा टाटा महाग!