Mumbai Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. सिक्युरिटी चेकदरम्यान प्रवाशांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. मुंबई विमानतळाचे (Mumbai Airport) सिक्युरिटी चेक क्षेत्र आता वाढवण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने नुकतंच वर्धित प्री-एमबार्केशन सिक्युरिटी चेक (PESC) क्षेत्राचं उद्घाटन केलं आहे. विमानतळावरील प्रवेशाच्या प्रक्रियेची क्षमता वाढवण्यासाठी, प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी या धोरणात्मक उपक्रमाची रचना करण्यात आली आहे.


पायाभूत सुविधांच्या वाढीसह, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता एकूण 5,735 चौरस मीटर सुरक्षा तपासणीचं क्षेत्र आहे. नवीन डिझाइन केलेलं सिक्युरिटी चेक क्षेत्र अंदाजे 2,075 चौरस मीटर संलग्न आहे, ज्यामुळे ते देशातील सर्वात मोठं सिक्युरिटी चेक भाग बनला आहे. यात आठ नवीन सुरक्षा मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.


हवाई प्रवासाची वाढती मागणी पाहता विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला. टर्मिनल 2 वर प्रवाशांना आता अधिक वेळ सिक्युरिटी चेकिंगमध्ये घालण्याची गरज नाही. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात वसलेलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) भारताच्या वाढत्या विमान वाहतूक उद्योगाचा पुरावा आहे. सुरक्षित आणि जलद प्रवासाचा अनुभव प्रदान करण्याच्या दृष्टीने विमानतळ प्रशासनाने सिक्युरिटी चेक क्षेत्र वाढवले आहे.


सिक्युरिटी चेक प्रकल्पाचा पहिला टप्पा 27 मार्च 2023 रोजी उघडण्यात आला, ज्यामध्ये आठ नवीन सुरक्षा लेन जोडले गेले, ज्यामध्ये D2D हस्तांतरण सुविधेचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सिक्युरिटी चेक क्षेत्राची जागा जवळपास दुप्पट करून अनुभव वाढवण्यावर भर दिला गेला.


याप्रसंगी बोलताना विमानतळ प्रशासनाचे प्रवक्ते म्हणाले, "आम्ही आठ नवीन सुरक्षा लेन सुरू केल्याबद्दल आणि आमच्या सिक्युरिटी चेक क्षेत्राच्या विस्ताराची घोषणा करताना आनंदी आहोत. ही पायाभूत सुविधा वाढवणं मुंबई विमानतळ T2 वर प्रक्रिया क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि आमच्या सर्व प्रवाशांसाठी जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करते. ही नवीन सुविधा आमच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यात मदत करतील याचा आम्हाला विश्वास आहे."


विस्तारित सुविधा प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी मदतीची ठरेल. नवीन सिक्युरिटी चेक पॉईंट्सचे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गुडनेस चॅम्पियन्स (सर्व्हिसेस स्पेशलिस्ट) तैनात करण्यात आले आहेत आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं असलेले प्रवासी आणि विशेष दिव्यांग प्रवाशांसाठी सिक्युरिटी चेकमध्ये प्राधान्य मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


हेही वाचा:


Lohagad fort: लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चार तास लोक महादरवाज्यात अडकले; व्हीडिओ व्हायरल