Ashwini Vaishnaw ON Uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात रखडला, असा आरोप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी केला आहे. बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिंदे-भाजप सरकारनं परवानग्या दिल्यानं प्रकल्पाला गती आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी 2.41 लाख कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली. यात हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन आणि नवीन ट्रॅकवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना वेगवेगळ्या प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली.


पाहा व्हिडीओ : Ashwini Vaishnaw PC : ठाकरेंमुळे बुलेट ट्रेनला अडचणी आल्या,शिंदे सरकार काळात परवानग्या लवकर मिळाल्या



मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव 


पत्रकार परिषदेत बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला तो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानग्या न दिल्यामुळे असं अश्विनी वैष्णव म्हणाले. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाहीत. मात्र, सरकार बदलताच आताच्या शिंदे-फडणवीस सरकारनं सर्व परवानग्या दिल्या असून प्रकल्पाला गती दिली जात आहे, असे वैष्णव यांनी स्पष्ट केलं. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल (बुधवारी) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं रेल्वेसाठी एकूण 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या विविध प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली. 


मोदींचा महत्त्वकांशी प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन


गुजरातमधील आठ जिल्ह्यांतून दादरा आणि नगर हवेलीतून जाणाऱ्या समांतर मार्गावर बांधकाम सुरू झाले आहे. वर्षानुवर्षे अर्धवट अवस्थेत राहिल्यानंतर, महाराष्ट्रासह इतर शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पानं अलीकडे वेग घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प 2027 मध्ये पूर्ण होऊ शकतो.