महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत  (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.  या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर सरकार येत्या 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जमा करणार आहे. त्यासाठी अर्जांची छाननी युद्धपातळीवर केली जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारकडे कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. महिलांनी या योजनेसाठी मोबाईल अॅप तसेच संकेतस्थळाच्या मदतीने अर्ज केलेले आहे. दरम्यान, छाननी केल्यानंतर महिलांच्या अर्जावर वेगवेगळ्या सूचना दाखवल्या जात आहेत. काही महिलांचे अर्ज पेंडिग आहेत, तर काही महिलांच्या अर्जाची स्थिती अप्रुव्ड असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या वेगवेगळ्या In Pending to Submitted, In Review, Disapproved, Approved, Rejected म्हणजे नेमकं काय? ते समजून घेऊ या... 


सध्या अनेक महिला आपले अर्ज दाखल करत आहेत. पण अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जासमोर वेगवेगळे ऑप्शन दाखवले जात आहेत. या वेगवेगळ्या ऑप्शन्सचा नेमका अर्थ अनेक महिलांना समजत नाहीये. खरं म्हणजे इंग्रजित दाखवल्या जाणाऱ्या या सूचनांच्या माध्यमातून महिलांच्या अर्जाची स्थिती काय आहे? याबद्दल सांला पैसे येणार की नाही? हे समजू शकते. 


अर्जावरील चार वेगवेगळ्या सूचनांचा नेमका अर्थ काय? 


एकदा अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या अर्जावर एकूण चार सूचनांपैकी कोणतीही एक सूचना दिसेल. या सूचनेनुसार तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का? तुमच्या खात्यात 17 ऑगस्टला तुम्हाला 3 हजार रुपये मिळणार की नाही? हे समजेल.


Disapproved म्हणजे नेमकं काय?


लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. डिसअप्रुव्ह झालेल्या अर्जांना पुन्हा एकदा सबमीट करण्याचा पर्याय आहे. डीसअप्रुव्ह सूचनेच्या खाली एडिट हा ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवर क्लीक करून तुमच्या अर्जात असलेली चूक दुरुस्त करून तुम्ही पुन्हा एकदा अर्ज भरू शकता. 


Pending to Submitted म्हणजे काय?


ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये रिजेक्टेड असे दाखवले जात आहे. असा ऑप्शन दिसल्यास आपला अर्ज बाद झाला आहे, असे समजावे. या महिलांना पुन्हा अर्ज करण्याची सध्यातरी संधी नाही. ज्या अर्जांसमोर In Pending to Submitted असे दिसत आहे, त्या महिलांनी काहीही करायचे नाही. असा ऑप्शन दिसल्यास तुमचा अर्ज सरकारकडे सबमीट झाला आहे. सरकार तुमचा फॉर्म चेक करत आहे, असे समजावे.


In Review म्हणजे काय?


ज्या महिलांच्या अर्जासमोर In Review असे दाखवले जात आहे, त्या महिलांनी घाबरण्याचे कारण नाही. या ऑप्शनचा अर्थ हा सरकारी अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची छाननी चालू आहे, असा होतो. त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झाला की बाद झाला हे नंतर समजेल. 


Approved चा अर्थ काय?


ज्या महिलांच्या अर्जासमोर Approved असा ऑप्शन दिसत आहे, त्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्या महिलांना येत्या 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये मिळणार आहेत.


हेही वाचा :


मराठीतून अर्ज ते बँक खात्यावर एक रुपया, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत काय-काय बदललं? जाणून घ्या तीन मोठे अपडेट !