नागपूर : निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात विस्कळीत झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विदर्भातून रायगडला गेलेले महावितरणचे कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. रायगडमधून परतलेले 7 कर्मचारी कोरोना बाधित आढल्यानंतर उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश दिले आहे. कोरोना बाधित आढळलेल्या 7 कर्मचाऱ्यांपैकी वर्धा जिल्ह्यातील 5 आणि नागपूर जिल्ह्यातील 2 आहेत.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मधील 3 तर देवळी आणि पुलगावचे एक एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तर नागपूर जिल्ह्यातील वाडी आणि बुटीबोरीमधील कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहे.
आता महावितरणने कोकणात गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले असून तोवर या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यातून 200 कर्मचारी कोकणात गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील वाडी मध्ये महावितरण चा कोरोना बाधित आलेला कर्मचारी राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.
विदर्भातून कोकणात वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी गेलेले महावितरणचे कर्मचारी कोरोनाबाधित
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
06 Jul 2020 03:18 PM (IST)
निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात विस्कळीत झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विदर्भातून रायगडला गेलेले महावितरणचे कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत.
सांकेतिक छायाचित्र
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -