मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 20 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 घेण्यात येणार आहे. त्यासाठी काल एमपीएससीने काढलेल्या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहून त्या पार्शवभूमीवर जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये केवळ पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकीच पुणे महसुली विभागाच्या बाहेरील जिल्हा/शहरामधील कायमस्वरूपी पत्ता नमूद असलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या म्हणजेच मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती केंद्र निवडण्याची यामध्ये मुभा देण्यात आली आहे.  मात्र, आता यावर सुद्धा काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री, एमपीएससी अध्यक्ष यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांनी आधी निवडलेली परीक्षा केंद्र बदलून देऊन त्यांच्या स्वतः च्या जिल्ह्यात त्यांना सोयीचे होईल असे जिल्हा केंद्र द्यावीत अशी मागणी केली आहे

एमपीएससीतर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यभरातून जवळपास अडीच लाख विद्यार्थी देणार आहेत. लॉकडाऊनपूर्वी जेव्हा ही परीक्षा घेण्याचे जाहीर झाले त्यावेळी अनेक विद्यार्थी ज्या ठिकाणी अभ्यास करताय अशा पुणे जिल्ह्यातील केंद्र म्हणून परीक्षेसाठी निवडले. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या मूळगावी गेल्याने परत पुणे किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासाला होते त्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणे कठीण असल्याने केंद्र बदलण्याची मूभा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत एमपीएससीने 14 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून ही मूभा देण्यात येत असल्याच सांगितले.

या परिपत्रकात नमूद केल्यानुसार पुणे सोडून इतर जिल्ह्यत वास्तव्यस असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र बदलून हवे असल्यास जवळच्या महसूल विभाग मुख्यालय असलेल्या जिल्ह्यात परीक्षा देण्यास यावे लागणार आहे. त्यामुळे पुणे सोडून विद्यार्थ्यांना औरंगाबाद, नाशिक, मुंबई, अमरावती, नागपूर हे केंद्र निवडण्याची मूभा आहे. यावर विद्यार्थ्यांनी आणि आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सोयीस्कर असा जिल्हा केंद्र म्हणून निवडता यावा असे केंद्र परिक्षेसाठी देण्याची मुभा करावी अशी मागणी आता केली आहे. कारण, लॉकडाऊनच्या पार्शवभूमीवर प्रवास करण्यासवर विद्यार्थ्यांना मर्यादा असताना अनेक ठिकाणी जिल्हाबाहेर प्रवासाला निर्बंध असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार आपपल्या किंवा सोयीच्या जिह्यात परीक्षा देण्यात आदेश द्यावेत अशी मागणी कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने केली आहे.