बीड: अंजनडोहमधील अश्विनी बाळासाहेब धापसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत राज्यातून एनटी क मुलींमधून राज्यात प्रथम क्रमांकाने यश मिळविले आहे. या यशामुळे तिचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. 


आई वडील निरक्षर, शिक्षण देऊन मुलीला नोकरी लावायची एवढे स्वप्न. काहीही करून मुलीला स्वतःच्या पायावर उभा करायचे स्वप्न मेंढपाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या आई वडिलानी बघितले होते. आता ते स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळतंय.


धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकरी बालासाहेब धापसे यांची मुलगी आश्वीनी धापसेनी  1ली ते 10 पर्यंतचे शिक्षण गावातच असलेल्या नुतन माध्यमिक विद्यालयात पुर्ण केले होते. सात एकर जमीन, तिही कोरडवाहू त्यात एक मुलगी, दोन मुले असे पाच जणांचे कुटूंब. 10 वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 88 टक्के गुण मिळाल्यानंतर अश्विनी धामसे हिचा शासकीय तंत्रमिकेतन कॉलेज औरंगाबाद येथे नंबर लागला होता. तीन वर्षे येथे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापिठात अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले. नंतर 2017 पासून एमपीएससी परिक्षेची तयारी सुरु केली. एक वर्षाच्या अभ्यासानंतर सन 2018 मध्ये महाराष्ट्र  दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा दिली होती. या परीक्षेत दोन गुणांनी तिचा नंबर हुकला होता.


अश्विनी धापसे पुन्हा औरंगाबाद येथे राहून अभ्यास केल्यनंतर मार्च  2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची पीएसआय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ( एनटी- क ) गटात मुलींतून धारुर तालुक्यातील अंजनडोह गावची अश्विनी बालासाहेब धापसे हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ही बाब अंजनडोहच नाही तर बीडकरासाठी अभिमानाची आहे.


अश्विनीच्या यशात भावाचा मोठा वाटा
अश्विनी आता पोलीस अधिकारी होणार आहे. तिच्या या यशात मोठा वाटा तिच्या भावांचा आहे. आश्विनीच्या एमपीएससी परीक्षेत तिचा मोठा भाऊ योगीनंद धापसे यांची मोठी मदत झाली. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने खाजगी कंपनीत नोकरी करून आर्थिक मदत केली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha