मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट क वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र आज जारी करण्यात आलं आहे. आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर जाऊन हे प्रवेशपत्र डाऊनलोड करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे. ही परीक्षा 3 एप्रिलला घेण्यात येणार आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली ही परीक्षा 900 जागांसाठी होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ही 22 डिसेंबरपर्यंत होती.  आता ही परीक्षा 3 एप्रिलला होणार असून त्यासंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे हेही आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे. 


 






परीक्षा कक्षात प्रवेश करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच परीक्षा केंद्रावरती परीक्षेच्या वेळेपूर्वी दीड तास हजर रहावं असंही आवाहन करण्यात आलं आहे. 


परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या निवेदनात सांगितलं आहे. तसेच परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यामध्ये काही अडचणी आल्यास त्यासंबंधी आयोगाने हेल्पलाईन क्रमांक आणि वेबसाईटची माहिती शेअर केली असून त्यावर उमेदवारांनी संपर्क करावा असं आवाहन केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: