मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2016 साली घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा भूषण अहिरे हा राज्यात पहिला आला आहे. उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत तब्बल 526 गुण मिळवत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. तर श्रीकांत गायकवाड आणि संजयकुमार ढवळे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर असलेल्या भूषणची उपजिल्हाधिकारी पदाकरता निवड झाली आहे. तर मुलींमधून साताऱ्याची पूनम संभाजी पाटील पहिली आली आहे. पूनमही अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असून पोलीस उप-अधीक्षक पदाकरता तिची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एकूण १ हजार ५७५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या परीक्षांचा आज (गुरुवारी) जाहीर झाला. यामध्ये एकूण 130 अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 34 मुलींचा समावेश आहे. साताऱ्याची पूनम पाटीलनं राज्यात मुलींमध्ये बाजी मारली.

एमपीएससी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.