Shrikant Shinde : शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या विरोधात भर सभेत मराठा युवकांनी घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेडे देखील दाखवण्यात आले आहेत. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी हातात काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी करणाऱ्यांना स्टेजवर बोलावून घेत त्यांचं म्हणणे ऐकूण घेतलं. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पाथरीत शिवसेनेची जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ही घटना घडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाजाचा विश्वास
मराठा तरुणांच्या अनेक व्यथा आहेत. शिक्षण, नोकरी आदीसह अनेक व्यथा असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. संबंध मराठा समाजाचा विश्वास हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. त्यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेले आहे की मराठा आरक्षण देणार असे श्रीकांत शिंदे म्हणाले. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केलेली आहे. त्याचा पाठपुरावा केलेला आहे कुणबी दाखलेही देणे सुरू असल्याचे शिंदे म्हणाले. सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे काम करत असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. यामध्ये कुणीही राजकारण करू नये असेही ते म्हणाले.
आत्ताची शिवसेना आणि मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांना न्याय देणारे आहेत. महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे आता खान पण आहे आणि बाण पण आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका सरकार करत असलेल्या कामांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी परभणीच्या पाथरीत केले आहे.
परभणीच्या पाथरीतील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या वतीने भव्य रोजगार मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या सभेसाठी श्रीकांत शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव नरेश मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती श्रीकांत शिंदे यांचे पाथरी मध्ये स्वागत हे मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने करण्यात आले अनेक जेसीबी लावून फुलांची उधळण तसेच दोन ठिकाणी क्रेन लावून क्विंटल क्विंटल चे हार घालत त्यांचं स्वागत करण्यात आलं पाथरीत आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यालयाचे लोकार्पण केलं यानंतर त्यांनी नोकरी महोत्सवाचे उद्घाटन करत अनेक तरुण-तरुणींना जागेवरच जॉब कार्डच वाटपही केलं .
महत्त्वाच्या बातम्या: