मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, समृद्धी महामार्ग इत्यादी प्रश्नांवर उद्धव ठाकरे आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली.

समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रकरणात शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली.