गाडीतून उतरुन खासदार डॉ. प्रीतम मुंडेंचे रुग्णावर उपचार
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2016 11:32 AM (IST)
बीडः बीडकरांना खासदार प्रीतम मुंढे यांच्यातील लोकप्रतिनिधीसोबतच त्यांच्यातील डॉक्टरी पेशाचाही अनुभव आला. बस आणि रिक्षा अपघातातील जखमींना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी तत्परता दाखविली. प्रीतम मुंडे काल परळीला येत होत्या. त्यावेळी काही वेळ आधीच कन्हेरवाडी गावाजवळ लातूर-नागपूर बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली होती.अपघात पाहिल्यानंतर प्रीतम मुंडे यांनी घटनास्थळी थांबून जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्याचसोबत त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडेही विचारपूस केली. या अपघातात उपचारादरम्यान केशव मुंडे यांचा मृत्यू झाला.