Amol Kolhe : सगळ्या योजनांचे पैसे मतांची बेगमी करण्यासाठी वळतात का? बहिण विचारते ओवाळणी दिली, पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय? बहीण विचारते भाच्याच्या नोकरी, लग्नाचं काय? मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवरूनही खोचक टोला लगावला.
संस्था असणाऱ्यांनी शरद पवारांचे बोट सोडले, भले भले म्हणणारे सोडून गेले
अमोल कोल्हे म्हणाले की, आमच्या मतदारसंघांमध्ये गुलाबी यात्रा निघाली. मात्र, या गुलाबी यात्रेला भाजपचे नेते काळे झेंडे दाखवत आहेत. लाडकी बहीण कोणाची हेच कळेनासं झालं आहे. मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्र्यांची हेच कळेनासं झालं आहे. असेही अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे यांनी सांगितले की पक्षावर गेल्यावर्षी अनेक अडचणी आल्या. विशेष म्हणजे संस्था असणाऱ्यांनी शरद पवारांचे बोट सोडले, भले भले म्हणणारे सोडून गेले. संस्था असतील तर अडचणी येतात असे अनेक जण सांगत होते, पण राजेश टोपे साहेबांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही. लोकसभा झांकी हे विधानसभा बाकी है असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
कळून चुकलं आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार
अमोल कोल्हे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका पुढे टाकण्याचं कारस्थान रचले जाते. त्यांना कळून चुकलं आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या