वसई : शहरात सासूने सुनेची निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे. वसईतील प्रतिष्ठीत कुंटुबात हे हत्याकांड घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सून आणि मुलगा हे अमेरिकेला राहतात. महिनाभराच्या सुट्टीनिमित्त भारतात आले होते. हत्येनंतर सासू स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली होती. सासूला सून आवडत नसल्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.


मृत 32 वर्षीय रिया माने हिचा पती रोहन माने हा अमेरिकेत इंजिनिअर पदावर नोकरी करतो. तर, रिया ही स्वतः नर्सची नोकरी करते. या दोघांचा सहा वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक लहानशी मुलगी ही आहे. एक डिसेंबरला रोहन आपली पत्नी आणि लहानग्या मुलीसोबत वसईला आपल्या आई-वडिलांकडे आला होता. रोहनचं लग्न झाल्यापासून रिया ही सासू आनंदीला आवडत नव्हती. अधून मधून या दोघांमध्ये वादविवाद ही होत होते. त्यातच आपल्या मुलाला आपल्याकडून लांब नेलं हाही राग सासूच्या मनात रटमटत होता. आज(15 डिसेंबर)सकाळी रियाची सासू आरोपी आनंदी माने हिने रियाच्या बेडरुममध्ये जावून, जवळच्याच फ्लॉवर पॉटने झोपेलेल्या रियाच्या डोक्यावर प्रहार करुन तिला ठार मारुन टाकलं. त्यानंतर स्वतः माणिकपूर पोलीस ठाण्यात जावून, आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सासू आनंदी माने हिला ताब्यात घेतले आहे. बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यातील रियाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

माने यांचं सदन कुंटुब आहे. मुलगा रोहन माने अमेरिकेला असतो. रोहनचे वडील स्वतः वन विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. सध्या रिटायर्ड झाले होते. सर्व काही व्यवस्थित चाललेलं. घटनेच्या दिवशी रियाचे सासरे आपल्या नातीला घेवून, बाहेर गेले होते. तर रियाचा छोटा दिर आणि त्याची पत्नी दुसऱ्या बेडरुममध्ये झोपले होते. डिसेंबरच्या अखेरपर्यंत रिया आणि रोहन हे पुन्हा आपल्या अमेरिकेला जाणार होते. मात्र, हे असं घडलं. आरोपी सासूला पोलिसांनी अटक केली असली तरी, घरचे असं कसं झालं याच दु:खात आहेत.

Nirbhya case | निर्भया हत्याकांड प्रकरणातील दोषींना 16 डिसेंबरला फाशी? | ABP Majha