पुणे : घराबाहेर जाताना आपण बाटलीतून नेलेलं किंवा विकत घेतलेलं पाणी शुद्ध असतं, असा ठाम विश्वास आपल्याला असतो. मात्र बाटलीबंद पाणी पिण्यायोग्य असतं का, असा सवाल उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. बाटलीबंद पाण्यात चक्क शेवाळ आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
बाटलीबंद पाण्यात शेवाळ आल्यामुळे बाटलीतील पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. हा धक्कादायक अनुभव पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना आला आहे. दूषित पाण्याने भरलेल्या या बाटल्या सीलबंद आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा भीतीदायक प्रकार समोर आला आहे.
श्रीपाद ऑक्सीमिस्ट या नावाने हे बाटलीबंद पाणी विकलं जातं. पिंपरी-चिंचवडच्या चिखलीमध्ये या पाण्याचं उत्पादन केलं जात असल्याचा उल्लेख बाटलीवर आहे. उत्पादनाची तारीख, आयएसओ मानांकन अशी सर्व माहिती अगदी व्यवस्थित छापण्यात आली आहे. कुठेही, कोणतीही त्रुटी नाही.
बेकायदेशीररीत्या सुरु असलेले पिण्याच्या पाण्याचे उद्योग ही मोठी समस्या आहे. बाटलीबंद पाण्याच्या कंपन्या भूछत्रासारख्या गावोगावी उभ्या राहिल्या आहेत. या स्थानिक कंपन्यांकडून स्वच्छेतेचे सगळे निकष पाण्यात बुडवले जातात. तेही अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून.
सीलबंद बाटलीतील पाण्यात शेवाळ, पुण्यातील धक्कादायक प्रकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2019 11:40 PM (IST)
बाटलीबंद पाण्यात शेवाळ आल्यामुळे पाण्याचा रंग हिरवा झाल्याचा धक्कादायक अनुभव पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना आला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -