Pune liquor licence : पुणे जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार नागरिकांना मद्य (pune) प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी परवाने दिले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांचा 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन (liquor licence) जोरात होणार आहे. पुणेकरांकडून "वन डे परमिट" साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहे.
परवान्याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे. यावरुन यंदा मद्यप्रेमी पुणेकरांना नव वर्ष साजरं करण्यासाठी चांगलीच मुभा मिळाली आहे. वन डे परमिटची किंमत पाच रुपये आहे. त्यामुळे अनेकांनी खरेदी केले आहेत. या सगळ्या मद्यप्रेमींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची 31 डिसेंबरला करडी नजर असणार आहे.
... तर गुन्हा दाखल होणार
सुमारे दीड लाखाहून अधिक लोकांना परवाने देण्यात आले आहे. त्यात विना परवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नेहमीची 14 तर 10 विशेष पथकं यंदा पुणेकरांवर नजर ठेवणार आहे. डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्य विक्री संदर्भात 240 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यासोबत 17 वाहनं जप्त करण्यात आले आहेत तर 50 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रात्रीच्या गस्ती, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच संशयित गाड्यांची तपासणी होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
विकेंड आल्यानं जोरदार सेलिब्रेशन
31 डिसेंबर रविवार आणि शनिवारी आल्याने पुण्यात जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातील सर्वजण सज्ज झाले आहेत. त्यात कोरोनामुळे दोन वर्ष 31 डिसेंबरला निर्बंध घालण्यात आले होते. यावर्षी निर्बंधमुक्त नव्या वर्षाचं स्वागत करता येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये मोठ्याप्रमाणात उत्साहाचं वातावरण दिसत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. यंदाही त्याच उत्साहात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक आतुर आहेत.
पुणेकरांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये
या काळात लष्कराची, विदेशी आणि गोव्यातील दारु स्वस्तात उपलब्ध करुन देतो, असं अनेकजण सांगतात. त्यानुसार विक्रीकरुन ते लाखो रुपये कमावतात. त्यामुळे पुणेकरांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून करण्यात आलं आहे.