BREAKING : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक, हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता विरेंद्र तावडेला सीबीआयकडून अटक
---------------------
नौसेनेची युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यावर वायू गळती, दोघांचा मृत्यू
---------------------
मुंबई : जुहूजवळ सुमुद्रात दोन युवक बुडाले, दुपारी एक वाजताची घटना, शोध सुरु
---------------------
औरंगाबाद - उपोषणादरम्यान शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर संताप, शिक्षण उपसंचालकांना शिक्षकांचा घेराव
---------------------
औरंगाबाद - उपोषणादरम्यान शिक्षकाचा मृत्यू, गजानन खरात यांना हृदयविकाराचा झटका, 9 दिवसांपासून उपोषण
---------------------
भारतीय महिलेचं काबुलमध्ये अपहरण, महिलेच्या सुटकेसाठी अफगाणिस्तान सरकारचे प्रयत्न सुरु : सूत्र
---------------------
ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ठाणे-वाशी दरम्यान लोकलमध्ये बिघाड, ऐन गर्दीवेळी प्रवाशांचा खोळंबा
---------------------
बीड : विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, बीडच्या बाळापूरमधील घटना
---------------------
मुंबई: डॉ.तात्याराव लहाने यांची बदली, वैद्यकीय शिक्षण संचलनालयात हंगामी सहसंचालक म्हणून नेमणूक,पदावर रुजू होणार नसल्याचं लहानेंचं स्पष्टीकरण
---------------------
१. अवघ्या काही तासात मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस
--------------------
2. कँपाकोलावासी टेचात राहत असताना दिघावासी बेघर होणार, मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार, सरकारकडूनही कुठलीही मदत नाहीच
-----------------------------
3.भाजपची तुलना निजामाशी करणाऱ्या संजय राऊतांना भाजपचं सोशल मीडियावरून उत्तर, उद्धव ठाकरेंची तुलना बेडकाशी, देश 'मातोश्री'च्या पुण्याईनं चालत नसल्याचा टोला.
-----------------------
4.पाच देशांच्या दौऱ्यानंतर मोदी दिल्ली विमानतळावर परतले, एनएसजी सदस्यत्वासाठी मॅक्सिकोचा पाठिंबा, मॅक्सिकोच्या अध्यक्षाकडून मोदींचं सारथ्य
----------------------
5.नील गाईच्या हत्येवरून मोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली, पर्यावरण विभागाला हत्येचा अधिकार कुणी दिली?मनेका गांधींचा प्रकाश जावडेकरांना सवाल,
----------------------
6. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवतांकडून मोदींवर स्तुतीसुमनं, वॉशिंग्टन डीसीतील मोदींच्या भाषणाचं कौतुक, संघाच्या तृतीय वर्गाचा समारोप
-------------------------
7.कल्याणमध्ये टोईंगवाल्यांच्या मनमानीमुळं 60 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू, टोईंग व्हॅनमागे धावताना ह्रदयविकाराचा झटका, माझाचा विशेष रिपोर्ट
-------------
8.एक्स्प्रेस वेवर भरधाव गाड्या पळवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, सततच्या अपघातानंतर पोलीसांना जाग, रावते आणि शिंदेंनीच नियम मोडल्याचं उघड
--------------------
9 भ्रष्ट कंत्राटदारांवरची मेहरबानी शिवसेनेला महागात पडणार, लोकायुक्तांकडून 1300 कोटीच्या कामांची चौकशी होणार, गलगलींच्या तक्रारीवर कारवाई
-----------------
10.उडता पंजाबवर सेन्सॉरचा आक्षेप का, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, प्रत्येक बदलावर आक्षेप घेणं चुकीचं असल्याचं सांगत कश्यप यांना सुनावलं
------------------