Monsoon Latest Update : नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्रात धडकलाय.  दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय, त्यामुळे चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत  मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते 5 दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे.


रत्नागिरी, नशिक, रायगड, पालघर, औरंगाबाद, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरात पावसाची शक्यता आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.  यावेळी ढगाळ वातावरण असेल. तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तळकोकणासह अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे.


आज कुठे कुठे पावसाची शक्यता, हवमान विभागाचा अंदाज काय? - 


मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, अहमदनहर, धारशीव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर


सोमवारी राज्यात कुठे पाऊस -
मुंबई, पालघार, ठाणे, नाशिक, अहमदनहर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार


मंगळवारी राज्यात कोणत्या भागात पाऊस - 


मंगळवारी राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोल, गोंदिया, भंडारा, नागपूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


15 जून रोजी काय स्थिती - 
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यत आली आहे. त्याशिवाय उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिली..