Nitin Gadkari in Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर-पैठण या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून, यात आतापर्यंत हजारो छोटे-मोठे झाडे तोडण्यात आले आहेत. ज्यात अनेक वर्षांचे वटवृक्षांचा देखील समावेश आहे. मात्र या कामात हटवण्यात आलेल्या 51  वटवृक्षांचे रुट बॅाल प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण करण्यात येत आहे. ज्यामुळे कित्येक वर्षांचे वटवृक्ष जिवंत राहणार आहे. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज पैठण येथे जाऊन रुट बॅाल प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण करण्यात येणाऱ्या वटवृक्षांच्या कामाची पाहणी करणार आहेत. 


अशी असणार रुट बॅाल प्रकिया...



  • प्रत्येक वृक्षासाठी 17 हजार या प्रमाणे 9 लाख रुपये खर्च करुन ही झाडे वाचवण्यात येणार आहेत.

  • यावेळी एकूण 51 वटवृक्षांचे रुट बॅाल प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण करण्यात येत आहे.

  • या सर्व प्रकल्पाची जबाबदारी वन खात्यावर सोपवण्यात आली आहे. 

  • शास्त्रीय पद्धतीने मुळांची आणि फांद्याची छाटणी केली जाणार आहे. 

  • जेसीबीच्या साहाय्याने हे वृक्ष उखडून 50 किलोमीटर वाहून नेत पुन्हा लावण्यात येत आहे. 

  • तर 7 फुटांचे खड्डे खोदून त्यात ह्युमिक अॅसिड, कोको फायबर, शेणखत याची प्रक्रिया करुन झाडे लावण्यात येत आहे. 


पैठण महामार्गाच्या कामाला अखेर सुरुवात


गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गाच्या कामाची मागणी होत आहे. दरम्यान यासाठी तीन वेळा उद्घाटन देखील करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पैठण तालुक्यात हा महत्वाचा मुद्दा ठरला.  दरम्यान राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर अखेर या कामाला पुन्हा मंजुरी मिळाली. तसेच प्रत्यक्षात कामाला देखील आता सुरवात झाली आहे. या कामासाठी 1600 कोटी रुपयांचा आंदाजित खर्च येणार आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


रस्ते वाहतूक आणि महामार्ग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.



  • रविवार 11 जून 2023 रोजी दुपारी 3 वाजता अकोला विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पैठण, जि.औरंगाबाद प्रयाण.

  • दुपारी 4 वाजता कावसानकर क्रीडा संकुल हेलिपॅड, पैठण येथे आगमन.

  • सायं. 5.10 वाजता कावसानकर क्रीडा संकुल हेलिपॅड, पैठण येथून हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.

  • सायंकाळी 5.30 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने वेलकम हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबादकडे प्रयाण.

  • सांय. 5.50 वाजता वेलकम हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे आगमन.

  • सांय. 6 ते 7 वाजेपर्यंत राखीव (वेलकम हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद). रात्री 9.15 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण.


इतर महत्वाच्या बातम्या: 


संभाजीनगरमध्ये होणार 27 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम; महानगरपालिका करणार अंदाजे 150 कोटींचा खर्च